संजय राऊतांना काळे फासणाऱ्याला लाखाचे बक्षीस:एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्याची वादग्रस्त घोषणा; नागा ‎‎साधूंविषयीच्या वक्तव्याचा निषेध

संजय राऊतांना काळे फासणाऱ्याला लाखाचे बक्षीस:एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्याची वादग्रस्त घोषणा; नागा ‎‎साधूंविषयीच्या वक्तव्याचा निषेध

खासदार संजय राऊत यांनी नागा ‎‎साधूंबद्दल केलेल्या वक्तव्याचा नगर ‎‎शहरात शिवसेनेच्या वतीने त्यांच्या ‎‎प्रतिमेला जोडे मारून निषेध ‎करण्यात आला. हिंदू धर्मियांच्या ‎‎भावना दुखावून साधू-संतांचा‎ अपमान करणाऱ्या राऊत यांच्यावर ‎‎कारवाईची करावी, अशी मागणी‎ करत शहरप्रमुख सचिन जाधव‎ यांनी संजय राऊत यांना काळे ‎‎फासणाऱ्याला एक लाख रुपयाचे ‎‎बक्षीस शिवसेनेच्या वतीने जाहीर ‎केले.‎ शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे‎ खासदार राऊत यांनी उपमुख्यमंत्री ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा‎ साधताना कुंभ मेळ्यातील नागा ‎साधूबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा ‎आरोप करत शिवसेनेच्या (शिंदे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎गट) वतीने आंदोलन करण्यात‎ आले. या आंदोलनात शहर प्रमुख‎ सचिन जाधव, माजी महापौर शिला‎ शिंदे, माजी नगरसेवक सुभाष लोंढे, अश्‍विनी जाधव, युवा‎सेनेचे महेश लोंढे आदींसह शिवसैनिक सहभागी ‎झाले होते. प्रतिमेला ‎जोडे मारून आंदोलन सचिन जाधव म्हणाले की, संजय राऊत‎ यांच्या बेताल वक्तव्याने ठाकरे सेना लयास गेलेली‎ आहे. वारंवार महापुरुष व साधु-संतांबद्दल ते बेताल ‎वक्तव्य करत आहेत. त्यांनी नागा साधूबद्दल केलेल्या ‎वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या‎ आहेत. साधू-संतांचा अपमान महाराष्ट्र सहन ‎करणार नाही. राऊत यांना काळे फासणाऱ्याला एक ‎लाख रुपयाचे बक्षीसही त्यांनी शिवसेनेच्या वतीने‎ जाहीर केले.‎ नागा साधूंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेने त्यांच्या प्रतिमेला ‎जोडे मारून आंदोलन केले.‎ काय म्हणाले होते संजय राऊत एकनाथ शिंदे हे कायमच अस्वस्थ आत्मा आहेत. यावेळी त्यांनी महाकुंभामध्ये नागा साधूकडे जाऊन बसायला हवे होते. नागा साधू हे कायम अस्वस्थ असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे जे नेते अस्वस्थ आहेत, त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे अस्वस्थ आत्म्यांनी तिकडे जाऊन गंगेत डुबकी घ्यावी, काही धर्मकार्य करावे, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका, तुमची राजकीय अस्वस्थता ही महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे अस्वस्थ मंत्र्यांनी कुंभमेळात जाऊन ध्यान धारणा करावी, असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला होता.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment