संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीड कोर्टात सुनावणी:संपूर्ण घटनेला वाल्मीक कराडने गाइड केले, उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. सरकारी उज्ज्वल निकम कोर्टात युक्तिवाद केला. संपूर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाइड केले, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर केला आहे. वाल्मीक कराडे या घटनेला गाईड केल्याचे सीडीआरमधून समोर आल्याचेही उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान आरोपींना व्हिसीद्वारे हजर करण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली असून या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. सध्या कोर्टात सुनावणी सुरू असून उज्ज्वल निकम युक्तीवाद केला. आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्रे दिली जाणार आहे. उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद काय? संपूर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाईड केले आहे. सीडीआरमधून देखील हे समोर आल्याचे उज्ज्वल निकम यांनी कोर्टात म्हटले आहे. फरार कृष्णा आंधळेने वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता. सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली. वाल्मीक कराडसह इतर आरोपींची 1 डिसेंबर रोजी तिरंगा हॉटेलमध्ये बैठक झाली होती. गँग लीडर सुदर्शन घुले आहे, त्याला वाल्मीक कराडने गाईड केले, असा युक्तीवाद उज्ज्वल निकम यांनी केला. निकमांनी केली तपास अधिकाऱ्यांशी चर्चा दरम्यान, सुनावणी अगोदर सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर आणि सीआयडीचे आयपीएस डॉ.बसवराज तेली यांनी बीडच्या शासकीय विश्रामगृहात उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. सुनावणी अगोदर उज्ज्वल निकम यांनी सर्व तपासी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणातले निघालेले सीडीआर आम्हाला द्या – धनंजय देशमुख दुसरीकडे या प्रकरणातले निघालेले सीडीआर आम्हाला द्यावेत, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणाविषयी बोलले आहेत. यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. गरज पडल्यास आणखी आंदोलन आम्ही करणार, आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. गावकरी कुठेच मागे सरकले नाहीत. आज सविस्तर बोलणे झाले तर आम्ही याबाबत वकील साहेबांना बोलणार आहोत किंवा दोन दिवसांनी त्यांची आमची भेट होणार आहे. फास्टट्रॅकवर प्रकरण चालवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. या प्रकरणातले निघालेले सीडीआर आम्ही मागणार आहोत, यामध्ये मोठ्या मोठ्या माणसांचे फोन कॉल त्यांच्या अज्ञानात झाले आहेत. अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी केली आहे.