सतरंजीने हातपाय बांधून बेदम मारहाण:12 लाख 87 हजार रुपयांच्या साहित्याची केली चोरी, बीडमधील टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

सतरंजीने हातपाय बांधून बेदम मारहाण:12 लाख 87 हजार रुपयांच्या साहित्याची केली चोरी, बीडमधील टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

बीडमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसत आहे. केज तालुक्यातील विडा येथे अवादा पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला सतरंजीने हातपाय बांधून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच रोटर केबल, स्टार्टन केबल, आर्थिंग केबल असे एकूण 12 लाख 87 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याची घटना 7 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यावर कारवाई करत पोलिसांनी या आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आणखी 6 आरोपी फरार बीड पोलिसांनी आरोपी बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे, लालासाहेब सखाराम पवार अशा चौघांना अटक केली आहे. या चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यात आणखी 6 आरोपी असल्याचे समोर आले आहे. परंतु हे आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई या सर्व आरोपींच्या विरोधात बीड व धाराशिव जिल्ह्यात संघटित पद्धतीने केज, नेकनूर, ढोकी, वाशी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत 11 गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. बीड पोलिसांची आतापर्यंत चार टोळींवर मोक्कांतर्गत कारवाई बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रायांना या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. या चोरी प्रकरणी 10 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याआधी बीडमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी बीड पोलिसांनी आतापर्यंत चार टोळींवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. त्यामध्ये, वाल्मीक कराडसह विष्णू चाटे आणि त्यांच्या गँगवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या कराड आणि गँग तुरुंगात आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment