सत्तेत आल्यावर RSS वर बंदी घाला:ऑल इंडिया उलेमा बोर्डाची 17 मागण्यांसह इंडिया आघाडीला पाठिंबा; नाना पटोले यांचे आश्वासन
ऑल इंडिया उलेमा बोर्डाने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्या सोबतच 17 मागण्यांचे एक निवेदनही प्रदेश काँग्रेसला दिले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या बद्दल आभार मानले असून राज्यात सरकार स्थापन झाल्या नंतर मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत निश्चित पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सुप्रिम बाॅडी चेअरमन असलेले नायाब अन्सारी, महाराष्ट्र प्रदेेश अध्यक्ष मौलवी अस्मान शेख व महासचिव माे. शहाबुद्दिन सौदागर यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या निवेदनात रा. स्व. संघावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. गुन्हे परत घ्यावेत महाराष्ट्रामध्ये 2012 पासून झालेल्या दंगलीमध्ये मुस्लीम समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल केले. महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर 2012 ते 2024 पर्यंत मुस्लीम समाजाच्या लोकांवर दाखल केलेले गुन्हा परत घ्यावे, जेलमध्ये असलेल्या मौलाना सलमान अजहरी यांना सोडण्याची शिफारश इंडिया आघाडीच्या 31 खासदारांनी आपापल्या लेटरपँडवर मोदी सरकारला पत्र द्यावे, महाराष्ट्रामध्ये मस्जिदचे इमाम, मोअजनला महाराष्ट्र सरकारतर्फे दर महिन्याला 15 हजार रूपये देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहे. राणेंना जेलमध्ये टाका रामगिरी महाराज, नीतेश राणे यांना जेलमध्ये टाकण्यासाठी इंडिया आघाडीने आंदोलन करावे, ऑल इंडिया उलेमा बोर्डचे मुफ्ती मौलाना, आलीम हाफिज मस्जिदचे इमाम यांना इंडी आघाडी महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यावर शासकीय समितीवर घेण्यात यावे, महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणूकमध्ये मुस्लीम समाजाच्या 50 उमेदवारांना तिकीट देण्यात यावे, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालमत्तेवर झालेल्या अतिक्रमणाला हटवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेमध्ये ठराव घेऊन कायदा करण्यात यावा अशी मागणीही केली आहे. यंत्रणा उपलब्ध करून द्या आर. एस. एस. संघटनेवर बंदी घालण्यात यावी, उलेमा बोर्ड ताकदीने महाराष्ट्रामध्ये इंडी आघाडीचे सरकार येण्यासाठी मोठ्या स्तरावर काम करणार आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 इंडिया आघाडीचा प्रचार करण्यासाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डला जिल्ह्यांमध्ये लागणारी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहे.