सावदा रुग्णालयास शिवरायांचे नाव देण्यासाठी युतीतर्फे उपोषण:विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी आमदार पाटलांचे आश्वासन‎

सावदा रुग्णालयास शिवरायांचे नाव देण्यासाठी युतीतर्फे उपोषण:विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी आमदार पाटलांचे आश्वासन‎

सावदा येथील ग्रामीण रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी १० वाजेपासून रुग्णालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले. मुक्ताईनगर व रावेर आमदारांच्या मध्यस्थीनंतर दुपारी दीड वाजता उपोषण मागे घेण्यात आले. पालिकेने आपल्या जुना दवाखान्याची जागा सन २०१० मध्ये ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी शासनाला दिली. त्यावेळी “राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय’ हे नाव द्यावे, या अटीवर ही जागा आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत केली. तेथे नंतर शासनाने भव्य रुग्णालय उभारले. पण, दोन वर्षे होऊनही त्याचे नामकरण करण्यास काही अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आक्षेप आहे. या कारणामुळे सोमवारी सकाळी यांनी केले उपोषण उपोषणात भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शाम अकोले, फिरोज पठाण, भाजप शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी, भाजप शहर सरचिटणीस महेश अकोले, मनीष भंगाळे, सागर चौधरी, देवेंद्र धांडे, सोहेल खान, माजी नगराध्यक्षा हेमांगी चौधरी, रंजना भारंबे सहभागी होते. ९ वाजता भाजप-सेना पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रूणालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले. जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या हलगर्जीमुळे ग्रामीण रुग्णालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यास विलंब होत असल्याचा आरोप केला. उपोषणस्थळी चर्चा करताना आमदार चंद्रकांत पाटील.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment