गांधी हत्येमुळे सावरकर, ब्राह्मण अन् हिंदुत्व बदनाम झाले:अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा; डॉक्टर दा. वि. नेने स्मृती पुरस्काराने सन्मान

गांधी हत्येमुळे सावरकर, ब्राह्मण अन् हिंदुत्व बदनाम झाले:अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा; डॉक्टर दा. वि. नेने स्मृती पुरस्काराने सन्मान

नथुराम गोडसेने ३० जानेवारी, १९४८ ला महात्मा गांधींची हत्या केली आणि त्यामुळे ब्राम्हण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले, असे प्रतिपादन शरद पोंक्षे यांनी केले. पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे अभिनेते शरद पोंक्षे यांना डॉ. दा. वि. नेने स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कर्वेरस्ता, कोथरूड येथील स्वामीकृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शरद पोंक्षे म्हणाले की, सन १९४६ पासून सावरकर सांगतात ते खरे होताना पाहून त्यांची व हिंदू महासभेची ताकद वाढत होती. अशा परिस्थितीत आपण १९५२ च्या निवडणुकांना कसे सामोरे जाणार हा प्रश्न नेहरूंना भेडसावत होता व ते एका चमत्काराची अपेक्षा करत होते. तो चमत्कार घडवला तो नथुराम गोडसे यांनी. गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या केली. ब्राह्मण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले. एका दैदिप्यमान अशा कारकीर्दीवर काळा डाग लावण्याची आयती संधी नेहरूंकडे चालून आली. सावरकरांना गांधी हत्येच्या कटात सामील असल्याचा ठपका ठेवत आरोपी क्रमांक ८ बनवण्यात आले. कोर्टात निर्दोष सुटून आजही काँग्रेसचे असे नेते जे स्वतः पुराव्याअभावी जामिनावर जेलबाहेर आहेत, ते नेते सावरकर गांधी हत्येत सहभागी होते परंतु पुराव्याअभावी सुटले असा कांगावा करत असतात, असे शरद पोंक्षे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “स्वतः सुप्रीम कोर्टात ५ वेळा माफी मागणारा काँग्रेसचा नेता जेव्हा मी सावरकर नाही, मी माफी मागणार असे म्हणतो तेव्हा फार गंमत वाटते. आज स्वातंत्र्यवीर सावरकर जाऊन ५८ वर्षे लोटली असली तरी दर २ महिन्यांनी काँग्रेसला त्यांच्यावर चिखलफेक करण्याची इच्छा होते. यावरूनच आजही त्यांच्यावर असलेली सावरकरी विचारांची दहशत कायम असल्याचे चित्र आहे.” स्वातंत्रपूर्व काळात १९३७ साली निर्बंधांमधून मुक्त झाल्यावर सावरकरांना कॉंग्रेसमध्ये सामील होण्याचे निमंत्रण होते. बऱ्याच भारतीयांना वाटत होते की, सावरकर आता काँग्रेसमध्ये जाऊन गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील. परंतु काँग्रेसने स्वीकारलेल्या हिंदी राष्ट्रवाद व त्यातून निर्माण झालेले पराकोटीचे मुस्लीमांचे लांगुनचालन यामुळे सावरकरांनी सदर प्रस्तावास नकार दिला. मोठ्या प्रमाणात विजयी इतिहास असताना देखील आम्हाला कायमच आमच्या पराभवाचा इतिहास शिकवला जातो. आम्ही जर इतके जास्त वेळा पराभूत झाले असतो, तर आज हिंदू म्हणून जगू शकलो नसतो, असे परखड मतही शरद पोंक्षे यांनी यावेळी मांडले.

​नथुराम गोडसेने ३० जानेवारी, १९४८ ला महात्मा गांधींची हत्या केली आणि त्यामुळे ब्राम्हण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले, असे प्रतिपादन शरद पोंक्षे यांनी केले. पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे अभिनेते शरद पोंक्षे यांना डॉ. दा. वि. नेने स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कर्वेरस्ता, कोथरूड येथील स्वामीकृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शरद पोंक्षे म्हणाले की, सन १९४६ पासून सावरकर सांगतात ते खरे होताना पाहून त्यांची व हिंदू महासभेची ताकद वाढत होती. अशा परिस्थितीत आपण १९५२ च्या निवडणुकांना कसे सामोरे जाणार हा प्रश्न नेहरूंना भेडसावत होता व ते एका चमत्काराची अपेक्षा करत होते. तो चमत्कार घडवला तो नथुराम गोडसे यांनी. गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या केली. ब्राह्मण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले. एका दैदिप्यमान अशा कारकीर्दीवर काळा डाग लावण्याची आयती संधी नेहरूंकडे चालून आली. सावरकरांना गांधी हत्येच्या कटात सामील असल्याचा ठपका ठेवत आरोपी क्रमांक ८ बनवण्यात आले. कोर्टात निर्दोष सुटून आजही काँग्रेसचे असे नेते जे स्वतः पुराव्याअभावी जामिनावर जेलबाहेर आहेत, ते नेते सावरकर गांधी हत्येत सहभागी होते परंतु पुराव्याअभावी सुटले असा कांगावा करत असतात, असे शरद पोंक्षे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “स्वतः सुप्रीम कोर्टात ५ वेळा माफी मागणारा काँग्रेसचा नेता जेव्हा मी सावरकर नाही, मी माफी मागणार असे म्हणतो तेव्हा फार गंमत वाटते. आज स्वातंत्र्यवीर सावरकर जाऊन ५८ वर्षे लोटली असली तरी दर २ महिन्यांनी काँग्रेसला त्यांच्यावर चिखलफेक करण्याची इच्छा होते. यावरूनच आजही त्यांच्यावर असलेली सावरकरी विचारांची दहशत कायम असल्याचे चित्र आहे.” स्वातंत्रपूर्व काळात १९३७ साली निर्बंधांमधून मुक्त झाल्यावर सावरकरांना कॉंग्रेसमध्ये सामील होण्याचे निमंत्रण होते. बऱ्याच भारतीयांना वाटत होते की, सावरकर आता काँग्रेसमध्ये जाऊन गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील. परंतु काँग्रेसने स्वीकारलेल्या हिंदी राष्ट्रवाद व त्यातून निर्माण झालेले पराकोटीचे मुस्लीमांचे लांगुनचालन यामुळे सावरकरांनी सदर प्रस्तावास नकार दिला. मोठ्या प्रमाणात विजयी इतिहास असताना देखील आम्हाला कायमच आमच्या पराभवाचा इतिहास शिकवला जातो. आम्ही जर इतके जास्त वेळा पराभूत झाले असतो, तर आज हिंदू म्हणून जगू शकलो नसतो, असे परखड मतही शरद पोंक्षे यांनी यावेळी मांडले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment