गरीब लोकांचे घर वाचवताना जीव गमावला:बाबा सिद्दिकींच्या मृत्यूनंतर झिशान सिद्दिकी यांची पहिली प्रतिक्रिया

गरीब लोकांचे घर वाचवताना जीव गमावला:बाबा सिद्दिकींच्या मृत्यूनंतर झिशान सिद्दिकी यांची पहिली प्रतिक्रिया

वांद्रे पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यानंतर त्यांचे पुत्र व वांद्रे पूर्व मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज पहिली प्रतिक्रीया दिली आहे. झिशान सिद्दिकी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. झिशान सिद्दिकी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले, माझ्या वडिलांनी लोकांचे संरक्षण करताना आणि निर्दोष गरीब लोकांची घरे वाचवताना जीव गमावला आहे. आज माझे पूर्ण कुटुंब कोलमडले आहे. पण माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण व्हायला नको. त्यांचे बलिदान व्यर्थ जायला नको. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, झिशान सिद्दिकी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये निर्दोष लोकांची घरे वाचवताना जीव गमावला आहे, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे एसआरएचा मुद्दा तर नाही न, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सगळ्या प्रकरणावर पोलिस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र झिशान सिद्दिकी यांनी केलेल्या पोस्टमध्ये असलेल्या घरांच्या उल्लखामुळे चर्चेला जोर आला आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास तीन आरोपींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी कार्यालयातून बाहेर पडले असता अज्ञात तीन आरोपींनी रिक्षातून येऊन बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात बाबा सिद्दिकी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले होते. बाबा सिद्दिकी यांच्यावर हत्या करणाऱ्या आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याची चर्चा आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment