एसडीएमने सीमेजवळ 1469 एकर जमीन खरेदी करून सोलर कंपन्यांना विकली:पाकिस्तानी सीमेलगतच्या प्रतिबंधित क्षेत्रात जमिनीचा खेळ!
राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात सीमेवरील जमिनी बाहेरील लोक आणि कंपन्यांना विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका उपविभागीय अधिकाऱ्याने (एसडीएम) हा प्रताप केला. गेल्या १० महिन्यांच्या नोंदीनुसार ७ सोलर कंपन्यांनी येथे ३५८५ एकर जमीन खरेदी केली. एसडीएम व कुटुंबाने १४६९ एकर जागा दोन सोलर कंपन्यांना विकली. रामसरचे एसडीएम अनिल जैन यांनी पदाचा वापर करत दुसऱ्या भागातील एसडीओंचा अतिरिक्त पदभार घेऊन जमीन खरेदी केली. जैन यांनी आई-वडील आणि भावाचाही वापर केला. शेतकऱ्यांकडून जमिनी १० ते ४० हजार रु. प्रति बिघा (अर्धा एकर) घेऊन एक लाख रु. प्रतिबिघा दराने विकल्या गेल्या. इथपर्यंत येण्यासाठी परवानगी आवश्यक पाक सीमेलगतच्या भागात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तीला जमीन खरेदी-विक्रीसाठी संबंधित एसडीएमची परवानगी घ्यावी लागते. एवढेच नाही तर बाहेरील व्यक्तीलाही या परिसरात प्रवासासाठी परवानगी घ्यावी लागते. मात्र रामसर एसडीएम जैन यांनी गद्रा रोड एसडीएमचा अतिरिक्त पदभार घेत सोलर कंपनीतील दोघांना नियमबाह्यरीत्या ६ महिने प्रतिबंधित क्षेत्रात ये-जा करण्याची परवानगी दिली. सर्व दस्तावेज नोंदणी रात्री ८ नंतर करण्यात आल्या. त्यावर साक्षीदार म्हणून एसडीएमचा भाऊ कपिलच्या स्वाक्षऱ्या आहेत. येथे आरआय ओमप्रकाश हे उपनिबंधक होते. त्यांनी आक्षेप घेतल्याने त्यांचा पदभार काढून घेण्यात आला. सीलिंग कायद्यानुसार, एखादी व्यक्ती जास्तीत जास्त ४३७ बिघे जमीन खरेदी करू शकते, परंतु एसडीएमचा भाऊ व आईच्या नावे पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे १५०० बिघावर जमीन खरेदी झाली. प्रतिबंधित क्षेत्रातील जमिनी विकण्याच्या सीएमओच्या आदेशाची चौकशी करत आहोत. -टीना डाबी, जिल्हाधिकारी, बाडमेर माझे वडील चाळीस वर्षांपासून हे काम करतात. त्यांनी जमीन घेतली असेल. सीलिंग कायद्यानुसार जास्त जमीन असली तर विकली असावी. यात काहीच चूक नाही. -अनिल जैन, उपविभागीय अधिकारी.
आपबीती… मला बहीण नाही, खोटी उभी केली.. कुबडिया गावातील दोन वृद्धांच्या ३०० बिघा जमिनीवर बनावट बोगस बहीण उभी करून दावा केला. वृद्धाने सांगितले की त्यांना ताज कंवर नावाची बहीणच नाही. आम्हाला दोन नोटिसा मिळाल्या नाहीत, परंतु आमची बाजू जाणून न घेता एसडीएमने २३ जुलै २०२४ रोजी एकतर्फी निर्णय घेतला. तिसऱ्या नोटिसीनंतर विरोधात निर्णय झाल्याचे कळले. जमीन देण्यास नकार; शिक्षकाला प्रतिनियुक्ती एसडीएमने बालेवा गावातील एका शिक्षकावर जमीन विक्रीसाठी दबाव आणला. जमीन दिली नाही म्हणून एका महिलेला खोटी फिर्याद देण्यास भाग पाडले. गटशिक्षणाधिकाऱ्यामार्फत शिक्षकाला प्रतिनियुक्तीवर मुनाबावला पाठवले. भास्करशी बोलताना शिक्षकाने सांगितले की ते मोठे साहेब आहेत. मला त्यांच्या विरोधात बोलायचे नाही.