शाकीर पठाणबरोबर दंगलीसह व्यापारी अपहरण, खंडणीच्या कटात सहभाग निष्पन्न‎:नाशिकमधील दर्गा दंगल, बोरसे उर्फ माेहम्मदच मास्टरमाइंड‎

शाकीर पठाणबरोबर दंगलीसह व्यापारी अपहरण, खंडणीच्या कटात सहभाग निष्पन्न‎:नाशिकमधील दर्गा दंगल, बोरसे उर्फ माेहम्मदच मास्टरमाइंड‎

दर्गा दंगल प्रकरणाला कलाटणी‎मिळाली असून काही दिवसांपूर्वी‎‎ मुस्लिम धर्म‎‎स्वीकारलेला ‎‎प्रणव उर्फ‎‎मोहम्मद‎‎ आमिन‎‎ तुकाराम बोरसे‎‎ याचा दंगल ‎‎कटात आणि ‎त्यापूर्वी व्यापारी अपहरण आणि‎ खंडणीच्या गुन्ह्यात सहभाग‎ असल्याची धक्कादायक माहिती ‎पोलिस तपासात निष्पन्न झाली‎ आहे. संशयिताला मुंबईनाका ‎पोलिसांनी अटक केली असून दोन दिवस‎पोलिस कोठडी सुनावण्यात आली ‎आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १६ एप्रिल रोजी काठे गल्ली‎येथील दर्गा दंगलीअगाेदर झालेल्या ‎राजकीय पदाधिकाऱ्यांच्या गुप्त‎बैठकीत सराईत गुन्हेगार मोहम्मद‎आमिन उर्फ प्रणव तुकाराम बोरसे‎याचा सहभाग निष्पन्न झाला.‎धक्कादायक बाब म्हणजे, दंगलीच्या‎गुन्ह्यात सहभागी असलेल्या‎बांधवांना सोडवण्यासाठी पैसे‎लागतील म्हणून दि. ४ एप्रिलला कार‎डेकोर व्यापाऱ्याचे अपहरण करुन‎एक कोटीची खंडणी मागितली गेली.‎तडजोडीअंती १५ लाखांची खंडणी‎मागितली गेली, या गुन्ह्यातही आमिन‎बोरसे याचा सहभाग तपासात निष्पन्न‎झाला. त्याच्या चाैकशीतून अनेक‎धक्कादायक घडामाेडी समाेर येत‎असल्याचे पाेलिसांनी सांगितले.‎मुंबईनाका पोलिसांनी संशयित‎बोरसेला सोमवारी (दि. १९)‎न्यायालयात हजर केले असता त्याला‎दि. २१ पर्यंत पोलिस कोठडीत‎ठेवण्याचे आदेश देण्यात आले‎आहेत.‎
दंगलीसाठी शस्त्रांची जमवाजमव केल्याचे उघड‎ दि. १४ एप्रिल रोजी गुंडाविरोधी‎पथक आणि एटीएसने केलेल्या‎संयुक्त कारवाईत दाेन‎संशयितांकडून चार कोयते जप्त‎करण्यात आले होते. पथकाने‎शादीक शब्बीर शेख यास‎कांबळेवाडी येथून अटक केली‎होती. त्याच्या चौकशीत अमिन‎उर्फ प्रणव बोरसे याने कोयते‎ठेवण्यास दिल्याचे सांगितले होते.‎तपासात हे शस्त्र १६ एप्रिल रोजी‎झालेल्या दंगलीत वापरणार‎असल्याची माहिती समाेर आली‎आहे.‎ या सराईतांचा सहभाग‎ दंगल प्रकरणात सराईत गुन्हेगार‎शाकीर उर्फ मोठा पठाण, समीर‎उर्फ छोटा पठाण याच्यासह आमिन‎उर्फ प्रणव बोरसे याच्यासह ४०‎संशयितांचा सहभाग निष्पन्न झाला‎आहे. यातील आठ संशयितांचा‎जामीन फेटाळला आहे.‎

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment