शनी शिंगणापुरात शनिदेवाला आजपासून ब्रँडेड तेलानेच अभिषेक:इथे घरांच्या दारांना कड्या नाही, चोरी केल्यास देव अंधत्वाची शिक्षा देतो अशी श्रद्धा

शिंगणापुरात शनिदेवाला आजपासून (1 मार्च) ब्रँडेड तेलानेच अभिषेक करण्यात येणार आहे. भेसळ, केमिकलयुक्त तेलाने शनिदेवाच्या शिळेची झीज होत आहे. ती टाळण्यासाठी शनिदेवास ब्रँडेड तेलच वाहण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. महिन्याला 40 ते 45 हजार लिटर, तर वर्षभरात 5 लाख लिटर तेल भाविकांकडून वाहिले जाते. तैलाभिषेक करणाऱ्या स्वतंत्र रांग असते. तेथून थेट चौथरा प्रवेश असतो. त्यामुळे देवस्थान कर्मचारी व सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना भाविकांनी सोबत आणलेल्या तेलाच्या बाटल्या, डबे यावर सहज लक्ष व नियंत्रण ठेवता येईल. संशय वाटल्यास कर्मचारी तेलाची तपासणी करणार आहेत. शनी शिंगणापूर हे गाव शिर्डीपासून अंदाजे 75 किमी आणि अहमदनगर शहरापासून 40 किमी अंतरावर आहे. या गावाला शनिदेवाचे गाव म्हणतात. शनिदेवाची पूजा करण्यासाठी आणि ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येतात. शिंगणापुरातील पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, एकदा शिंगणापूर गावात मोठा पूर आला होता. या पूरात शनिदेवाची मूर्ती वाहून येत एका झाडात अडकली. पूर ओसल्यावर एका मेंढपाळाने मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला असता मूर्तीतून रक्तस्त्राव सुरू झाला. हे पाहून तो घाबरुन पळून गेला. पण, त्याच रात्री शनिदेवाने त्या मेंढपाळाला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की, ती मूर्ती शनिदेवाचे स्वंभू स्वरूप आहे आणि गाव संरक्षित ठेवण्यासाठी या मूर्तीची दररोज पूजा केली पाहिजे. मला इथून उचलण्यासाठी मला बैलांची जोडी हवी आहे, जी मामा-पुतणे असावी. त्यांच्यासोबत काही काका-पुतणे जोडपे त्या बैलांना चालवून मला उचलायला आणा आणि मला आणून गावात बसवा. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना हे स्वप्न सांगितले. मग काय, मामा-पुतण्या असलेल्या दोन बैलांचा शोध सुरू झाला. तर, अशी बैलजोडी सापडली. त्यानंतर एका काका-पुतण्याचा शोध लागला. अशा प्रकारे शनिदेवाच्या मंदिराची स्थापना झाली. मात्र, ही शिळा फार पूर्वीपासून तशीच ठेवण्यात आली होती. नंतर त्यासाठी व्यासपीठ बांधण्यात आले. जवळच असलेल्या सोनई गावात लोढा सेठजींच्या घरी मुलाचा जन्म झाला तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी व्यासपीठ बांधले होते. असे म्हटले जाते की, काका-पुतण्यांनी एकत्र या मंदिरात दर्शन घेतल्यास शनिदेवाचा आशीर्वाद अनेक पटींनी अधिक असतो. शिंगणापूर गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कोणत्याही घराला कुलूप नाही. असे मानले जाते की शनिदेव स्वतः या गावाचे सर्व संकटे, अपघात आणि चोरीपासून संरक्षण करतात, तसेच चोरीची घटना घडल्यास शनिदेव त्यांना अंधत्वाची शिक्षा देतात अशीही श्रद्धा आहे. शनीदेवाच्या जन्माशी संबंधित एक कथा
शनिदेव हे सूर्य आणि संज्ञाचे पुत्र मानले जातात. संज्ञा ही दक्ष प्रजापतीची मुलगी होती. पती सूर्याची उष्णता आणि तेज तिला सहन होत नव्हते. एके दिवशी तिला असे वाटले की जप, तपश्चर्या आणि उपवास करून आपले तेज वाढवावे. तरच ती तेज सहन करू शकेल. संज्ञाला तीन मुले होती. वैवस्थ मनु, यमराज आणि यमुना. एके दिवशी संज्ञाला वाटले की तिने सूर्यदेवाला न सांगता वडिलांच्या घरी जाऊन तपश्चर्या करावी. त्यासाठी तिने सारखी दिसणारी स्त्री तयार करून तिचे नाव सुवर्णा ठेवले. यानंतर सुवर्णा यांच्यावर तिन्ही मुलांची जबाबदारी टाकण्यात आली. तू कोण आहेस याचे सत्य कोणालाही कळू नये, असेही संज्ञाने तिला बजावले. म्हणजे तू संज्ञा नसून सुवर्णा आहेस. असे म्हणत संज्ञा वडिलांच्या घरी गेली. जेव्हा दक्षाला आपल्या मुलीकडून आई-वडिलांच्या घरी येण्याचे कारण कळले तेव्हा तो दुःखी झाला. तिला रागावत त्याने संज्ञाला सांगितले की, तिला न बोलावता वडिलांच्या घरी येणे चुकीचे आहे. त्यामुळे तू आत्ता येथून तुझ्या पतीच्या घरी जा. संज्ञाने वडिलांचे ऐकले नाही. ती पतीकडे गेली नाही. उलट ती एका निर्जन जंगलात गेली. तेथे जाऊन तिने तपश्चर्या सुरू केली. दुसरीकडे, सूर्या आणि सुवर्णाला आणखी तीन मुले होती. यापैकी एक भगवान शनी होते. सुवर्णाला ती कोण आहे, याबद्दल सूर्याने कधीच शंका घेतली नाही.