शरद पवारांची शॅडो कॅबिनेट तयार:सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर ठेवणार लक्ष, महाराष्ट्र पिंजून काढण्याचे दिले आदेश

शरद पवारांची शॅडो कॅबिनेट तयार:सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर ठेवणार लक्ष, महाराष्ट्र पिंजून काढण्याचे दिले आदेश

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन झाले व त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 100 दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन देखील करण्यात आले होते. शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा देखील गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी घेतला. आता सरकारच्या या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून ‘शॅडो कॅबिनेट’ची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून शॅडो कॅबिनेट तयार करण्यात आली असून या माध्यमातून राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी देखील देण्यात आली आहे. या नेत्यांना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत. या संदर्भातील बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला आमदार व खासदार उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्र फिरून राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी जयप्रकाश दांडेगावकर, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली आहे. या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची देखील रणनीती आखण्यात आली आहे. पदाधिकारी बदलायची गरज वाटत असेल तर पदाधिकारी देखील बदलण्यास सांगितले आहे. यावेळी शरद पवारांनी पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पुढील तीन महिन्यात महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल द्या, असे आदेश शरद पवारांनी या नेमलेल्या नेत्यांना दिले आहेत. या बैठकीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाले. त्यामध्ये सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणारी टास्क टीम तयार करण्यात आली. तसेच विभागनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले असून 7-8 मार्चपासून या नेत्यांना विभागनिहाय दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय हा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होईल. या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपदाबाबत जो प्रस्ताव दिला जाईल त्यावर सरकारनेही विचार करावा असा ठराव या बैठकीत मांडण्यात आला आहे. शरद पवारांच्या शॅडो कॅबिनेटमध्ये कोणाला कोणती जबाबदारी?

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment