शरद पवारांच्या 5 आमदारांनी खरेदी केली 29 कोटींची संपत्ती:सत्ता असो की नसो आमदारांच्या संपत्तीत वाढ सुरूच
उमेदवारांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रावरून त्यांची संपत्ती समोर येत आहे. त्याचा तपशील तपासला असता असे लक्षात येते की, काही आमदार सत्तेत असो की नसो त्यांच्या संपत्तीत वाढ होते. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या बंडानंतर शरद पवारांना साथ देणारे आमदार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापैकी पाच जणांनी या कालावधीमध्ये २९ कोटी ९४ लाख रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने उमेदवारांनी गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत स्वत: तसेच पत्नीच्या नावे संपत्ती खरेदी केली आहे. त्यांचा भर जमिनी, फ्लॅट, महागडी वाहने विकत घेण्यावरच राहिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या खरेदीत शरद पवारांचे नातू, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार पहिल्या नंबरवर असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रातून समोर आले. 1. रोहित पवार, कर्जत, जामखेड । ७.५० कोटी
२०२४ : हडपसर, पुणे येथे ७ कोटी १० लाख रुपयांचा फ्लॅट २०२२ व २०२३ : पुरंदर तालुक्यात ४३ लाख रुपयांची जमीन खरेदी.
2. राजेश टोपे, घनसावंगी । २.१५ कोटी
२०२४ : सामनगाव येथे ८०.६३ लाखांची १२ एकर २० गुंठे जमीन २०२३ : श्रीकृष्णनगर येथे ५६.७० लाखांची जागा, ५७ लाख रुपयांची टोयाेट फॉर्च्युनर कार घनसावंगी येथे ९.९३ लाखांचा प्लॉट, अंबड येथे १० लाख रुपयांची जागा
3. जितेंद्र आव्हाड । १९.२६ कोटी
२०२३ : ओवळा येथे ९.६३ कोटी रुपयांच्या दोन वाणिज्यिक इमारती. कफ परेड, मुंबई येथे १.५ कोटीचा फ्लॅट
4. बाळासाहेब पाटील, कराड उत्तर । ६७.२५ लाख
२०२३ : गायकवाडवाडी येथे ६० लाखांची १२ एकर ३२ गुंठे जमीन २०२३ : गायकवाडवाडी येथेच पत्नीच्या नावे ३.११ एकर ७.२५ लाखांची
5. सुनील भुसारा, विक्रमगड
२०२२ : ३५ लाख रुपये किमतीची फोर्ड एंडेव्हर कार
कमी कालावधीत अधिक परतावा म्हणून फ्लॅट, व्यावसायिक इमारती खरेदी : मुंबई परिसर तसेच राज्यातील शहरी भागातील फ्लॅट, व्यावसायिक इमारती खरेदीवर या आमदारांनी लक्ष केंद्रित केले होते. ग्रामीण भागाचे नेतृत्व करत असलेल्यांनी मूळ गावाजवळ तसेच मतदारसंघातच शेतजमीन, प्लॉट घेतल्याची नोंद शपथपत्रात आहे.