शेतकऱ्यांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट:केलेल्या नियोजनातूच उन्हाळी पिकांसाठी पाणी द्या!

शेतकऱ्यांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट:केलेल्या नियोजनातूच उन्हाळी पिकांसाठी पाणी द्या!

प्रतिनिधी | अकोला रब्बीसाठी केलेल्या नियोजनातून उन्हाळी पिकांसाठी पाणी द्या; आम्हाला वेगळे किंवा नव्याने पाणी नको. केवळ मार्चऐवजी एप्रिलमध्ये पुरवठा करावा, अशी मागणी बुधवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे केली. शेतकऱ्यांनी त्यांना निवेदनही सादर केले. काटेपूर्णा सिंचन प्रकल्प बचाव समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार खरीप हंगामातील मुख्य पीक असलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातून गेले. तूर, हरभरा पिकांचे उत्पादन घटले. त्यामुळे जानेवारी महिन्यात तीळ, उन्हाळी मका व काही प्रमाणात उशिरा गव्हाची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षी विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून पाणी सोडण्याबाबत सर्वसमावेशक बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे नियोजनाअभावी पाण्याचा अपव्यय झाला. अपव्यय टाळण्यासाठी आवर्तनांच्या दिवसांमध्ये कपात करून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली. निवेदन देताना समन्वयक अॅड. संतोष गावंडे, शरद गाडगे, मिलींद देशमुख, मंगेश भटकर आदी होते. शेतकऱ्यांना फटका आम्ही सिंचनासाठी शिल्लकचे पाणी मागत नसल्याचे समितीने निवेदनात नमूद केले. पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी व शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच पुरवठा केला. परिणामी पाण्याच्या अवव्ययाची चूक आमची नसून, विभागाच्या चुकांच्या नियोजनाची झळ शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुले किमान १५ दिवसांचे एक आवर्तन एप्रिलमध्ये देण्यात यावे, अशी मागणी समितीने केली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment