सिद्दिकींच्या हत्येमागे बिष्णोई टोळी; हरियाणाच्या तुरुंगामध्ये शिजला कट:आराेपींचे कुर्ला, पुणे, अकोल्यातही कनेक्शन; 2.5 लाखांत सुपारी

सिद्दिकींच्या हत्येमागे बिष्णोई टोळी; हरियाणाच्या तुरुंगामध्ये शिजला कट:आराेपींचे कुर्ला, पुणे, अकोल्यातही कनेक्शन; 2.5 लाखांत सुपारी

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा संपूर्ण कट हरियाणाच्या तुरुंगात रचण्यात आला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. या तुरुंगात शूटर गुरमेल बलजितसिंग, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गाैतम ऊर्फ शिवा यांची पहिल्यांदा भेट झाली होती. तिथे हे तिघे बिष्णोई टोळीच्या संपर्कात आले होते. यापैकी धर्मराज आणि शिवा हे दोघे उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील एकाच गावाचे रहिवासी असून ते पुण्यात एकाच भंगार विक्रेत्याकडे काम करीत होते. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्दिकी यांच्या हत्येसाठी सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांकडून दोन शस्त्रांसह २८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती, केवळ तीन पोलिस सुरक्षेसाठी तैनात होते असे मंुबई पोलिसांनी स्पष्ट केले. हत्याकाडांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुंबई पोलिसांची १५ पथके तैनात करण्यात आली आहेत. कुर्ल्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, ४० दिवस रेकी आरोपी धर्मराज कश्यप आणि गुरमेल बलजितसिंग हे दोघे हत्येपूर्वी कुर्ला परिसरात दरमहा १४ हजार रुपये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते, तर तिसरा आरोपी शिवा हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो पुण्यात राहत होता. या आरोपींनी सिद्दिकी यांच्या घर आणि कार्यालयाची ४० दिवस रेकी केली होती. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणात नवा अँगल समोर आला असून हत्येवेळी १०-१५ जणांच्या टोळक्याचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या जवळच्या सूत्रांनी दिव्य मराठीला ही माहिती दिली. केवळ बाबा सिद्दिकीच नाही तर त्यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार झिशान हेदेखील लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांनी दिव्य मराठीला फोनवरून सांगितले की, बाबा सिद्दिकी शनिवारी रात्री त्यांचा मुलगा झिशानच्या ऑफिसमधून घरी जात होते. दसऱ्याला रस्त्यावर फटाके फोडले जात होते. इतक्यात १०-१५ मुलांचा एक ग्रुप आला आणि बाबा सिद्दिकी यांना विचारले, ‘ते आमच्यासोबत दसरा साजरा करणार नाही का?’ अशा कार्यक्रमांमध्ये बाबा सिद्दिकी अनेकदा लोकांमध्ये जात असत. शनिवारी रात्रीही त्यांनी मुलांच्या सांगण्यावरून फटाके फोडायला सुरुवात केली. यानंतर ते कारच्या पुढच्या सीटवर बसत असताना फटाक्यांच्या आवाजात ३ जणांनी गोळीबार केला. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात एक सोशल मीडिया पोस्टदेखील समोर आली आहे, ज्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीने हत्येची जबाबदारी घेतली आहे. या पोस्टसंदर्भातील तपास सुरू आहे. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव शुभू लोणकर असून तो अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने पोस्टमध्ये लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई यांना टॅग केली आहे. फोन कॉलमुळे आमदार झिशान बचावले बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी घरी जाण्यासाठी ऑफिसमधून एकत्र निघाले होते. इतक्यात फोन आला आणि झिशान पुन्हा ऑफिसला गेले. झिशान ऑफिसमध्ये बसून फोनवर बोलत होते तेवढ्यात गोळीबाराचा आवाज आला. शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक बिष्णोई टोळीशी संबंधित अकोल्याच्या शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर (२८) याला पुण्यातून अटक करण्यात आली. शुभम,धर्मराज आणि शिवासोबत तोही बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. तत्पूर्वी,शुभम याने शुभू लोणकर नावाने रविवारी सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्विकारली होती. सिद्दिकी सुपूर्द-ए-खाक : नेते, बॉलीवूड स्टार्सच्या उपस्थितीत मुंबईच्या बडा कब्रस्तानात दफनविधी माजी मंत्री सिद्दिकी यांना शासकीय इतमामात सुपूर्द-ए-खाक करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी पार पडला. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक राजकीय नेते, बॉलीवूड स्टार्सनी सिद्दिकी यांच्या घरी जाऊन त्यांचा मुलगा आमदार झिशान आणि सिद्दिकी कुटंुबीयांचे सांत्वन केले.

​माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा संपूर्ण कट हरियाणाच्या तुरुंगात रचण्यात आला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. या तुरुंगात शूटर गुरमेल बलजितसिंग, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गाैतम ऊर्फ शिवा यांची पहिल्यांदा भेट झाली होती. तिथे हे तिघे बिष्णोई टोळीच्या संपर्कात आले होते. यापैकी धर्मराज आणि शिवा हे दोघे उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील एकाच गावाचे रहिवासी असून ते पुण्यात एकाच भंगार विक्रेत्याकडे काम करीत होते. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्दिकी यांच्या हत्येसाठी सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांकडून दोन शस्त्रांसह २८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती, केवळ तीन पोलिस सुरक्षेसाठी तैनात होते असे मंुबई पोलिसांनी स्पष्ट केले. हत्याकाडांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुंबई पोलिसांची १५ पथके तैनात करण्यात आली आहेत. कुर्ल्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, ४० दिवस रेकी आरोपी धर्मराज कश्यप आणि गुरमेल बलजितसिंग हे दोघे हत्येपूर्वी कुर्ला परिसरात दरमहा १४ हजार रुपये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते, तर तिसरा आरोपी शिवा हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो पुण्यात राहत होता. या आरोपींनी सिद्दिकी यांच्या घर आणि कार्यालयाची ४० दिवस रेकी केली होती. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणात नवा अँगल समोर आला असून हत्येवेळी १०-१५ जणांच्या टोळक्याचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या जवळच्या सूत्रांनी दिव्य मराठीला ही माहिती दिली. केवळ बाबा सिद्दिकीच नाही तर त्यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार झिशान हेदेखील लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांनी दिव्य मराठीला फोनवरून सांगितले की, बाबा सिद्दिकी शनिवारी रात्री त्यांचा मुलगा झिशानच्या ऑफिसमधून घरी जात होते. दसऱ्याला रस्त्यावर फटाके फोडले जात होते. इतक्यात १०-१५ मुलांचा एक ग्रुप आला आणि बाबा सिद्दिकी यांना विचारले, ‘ते आमच्यासोबत दसरा साजरा करणार नाही का?’ अशा कार्यक्रमांमध्ये बाबा सिद्दिकी अनेकदा लोकांमध्ये जात असत. शनिवारी रात्रीही त्यांनी मुलांच्या सांगण्यावरून फटाके फोडायला सुरुवात केली. यानंतर ते कारच्या पुढच्या सीटवर बसत असताना फटाक्यांच्या आवाजात ३ जणांनी गोळीबार केला. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात एक सोशल मीडिया पोस्टदेखील समोर आली आहे, ज्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीने हत्येची जबाबदारी घेतली आहे. या पोस्टसंदर्भातील तपास सुरू आहे. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव शुभू लोणकर असून तो अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने पोस्टमध्ये लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई यांना टॅग केली आहे. फोन कॉलमुळे आमदार झिशान बचावले बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी घरी जाण्यासाठी ऑफिसमधून एकत्र निघाले होते. इतक्यात फोन आला आणि झिशान पुन्हा ऑफिसला गेले. झिशान ऑफिसमध्ये बसून फोनवर बोलत होते तेवढ्यात गोळीबाराचा आवाज आला. शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक बिष्णोई टोळीशी संबंधित अकोल्याच्या शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर (२८) याला पुण्यातून अटक करण्यात आली. शुभम,धर्मराज आणि शिवासोबत तोही बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. तत्पूर्वी,शुभम याने शुभू लोणकर नावाने रविवारी सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्विकारली होती. सिद्दिकी सुपूर्द-ए-खाक : नेते, बॉलीवूड स्टार्सच्या उपस्थितीत मुंबईच्या बडा कब्रस्तानात दफनविधी माजी मंत्री सिद्दिकी यांना शासकीय इतमामात सुपूर्द-ए-खाक करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी पार पडला. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक राजकीय नेते, बॉलीवूड स्टार्सनी सिद्दिकी यांच्या घरी जाऊन त्यांचा मुलगा आमदार झिशान आणि सिद्दिकी कुटंुबीयांचे सांत्वन केले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment