सोलापूरवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सची राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला धडक:अपघातात 25 प्रवाशी गंभीर जखमी

सोलापूरवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सची राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला धडक:अपघातात 25 प्रवाशी गंभीर जखमी

सोलापूर वरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने नागपूर तुळजापूर महामार्गावरील पुलाला धडक दिल्याने भीषण अपघात ल्याची घटना रविवारी मध्यरात्री दरम्यान ३:३० वाजताच्या सुमारास यवतमाळ तालुक्यातील हिवरी हेटी नजीक घडली.या भीषण अपघातात २५ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सोलापूर येथून नागपूर कडे जाणारी सैनी ट्रॅव्हल्स एम एच ४० सी.एम.५०३५ हि रविवारी मध्य रात्री 3.30 वाजता दरम्यान नागपूर कडे जात असताना,यवतमाळ तालुक्यातील हिवरी हेटी जवळ चालकाचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटल्याने पुलाला धडक दिली. हि घडक एवढी भयानक होती की,ट्रॅव्हल्सचा समोरील भागाचा पूर्ण चुराडा झाला असून,स्टेअरिंग तुटून चालकां समवेत पुलात पडले.यासोबत गाडीचे इंजिन दरवाज्यात येऊन अडकले. या भीषण अपघातात २५ प्रवासी गंभीर जखमी झाले.या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण चे निरीक्षक प्रशांत कावरे,वाहतूक शाखेचे ज्ञानोबा देवकते,उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.दरम्यान
त्या प्रवाशांना उपचारांकरिता रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाच रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जखमी रुग्णांना उपचारांकरिता श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे पाठविण्यात आले

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment