सोमनाथ सूर्यवंशीला पोलिस कोठडीत मारहाण नाही:त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध; परभणी प्रकरणावरुन फडणवीसांचे निवेदन

सोमनाथ सूर्यवंशीला पोलिस कोठडीत मारहाण नाही:त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध; परभणी प्रकरणावरुन फडणवीसांचे निवेदन

परभणी जिल्ह्यातील घडलेल्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन दिले. तसेच या प्रकरात मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारच्या वतीने केली जाणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. मात्र, एखाद्या प्ररकणावर शंका उपस्थित होत असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी. म्हणूनच या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याची घोषणा देखील फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्तीची समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, सूर्यवंशीला पोलिस कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सूर्यवंशी यांना दोन वेळा न्यायाधीशासमोर उभे करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी मारहाण केली का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी पोलिसांनी मारहाण केली नसलयाचे सांगितलं आहे. तसेच ते पोलिस कोठडीत असतानाचे सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत. असा दावा देखील फडणवीस यांनी केला. वास्तविक सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आधार आहे. त्याचा उल्लेख त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये लिहिलेला असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या जुन्या जखमांचा देखील उल्लेख पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. सूर्यवंशी यांना पोलिस कोठडीतून ज्यावेळी न्यायालयीन कोठडीत नेले गेले, त्यावेळी त्यांना जळजळ होत होती. तशी तक्रार सहकारी कैद्याने केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment