सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक:पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच मृत्यू, सुषमा अंधारे यांचा आरोप

परभणी येथे घडलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली. यात सोमनाथ सूर्यवंशी नामक एका आंबेडकरी अनुयायाला सुद्धा अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, संजय वाकोडे हा पॅंथरचा माणूस. या माणसाला इतक्या शारीरिक व्याधी आहेत की हा जागचा हालू शकत नाही. विजय वाकोडेची सध्या शुगर आणि अनेक अजरांनी त्रस्त आहेत. जुना जाणता पॅंथरचा माणूस आहे आणि हा माणूस रस्त्यावर येऊन तोडफोड करूच शकत नाही. अशा माणसाला मध्ये घेता तुम्ही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, रवी सोनकांबळे नगरसेवक राहिलेला माणूस. अत्यंत समंजस, परभणीमध्ये शांतता राहावी म्हणून अनेकवेळा शांतता कमिटीवर काम केलेला हा माणूस. सुधीर साळवे, साई नरवडे, महादेव ननावरे, किशोर बोराडे, सतिश भालेराव, आत्माराम राऊत, विशाल जंगले, सुरज खिल्लारे, रमेश मोरे, अशी अनेक नावे सुषमा अंधारे यांनी यावेळी घेतली. एका एका कुटुंबातील सर्वच सदस्य म्हणजे जामीन घ्यायला कोणीच शिल्लक नाही राहिले पाहिजे, अशा सर्व लोकांना अटक केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, सोमनाथ सूर्यवंशी हा लॉच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी जो फक्त आणि फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता, याला इतकी बेदम मारहाण केली गेली की याची मारहाण अक्षरशः जणू याच्यावर एखाद्या धारदार शस्त्राने वार केले आहेत. अशा पद्धतीची मारहाण जर तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला करत असाल आणि त्यानंतर त्याचा बळी जात असेल भलेही तो एमसीआरमध्ये मेला, त्याचा एमसीआर चालू असताना तो गेला. पण त्याला पोलिस कस्टडीमध्ये अमानुष मारहाण केली गेली असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.

  

Share