जि.प. आदर्श केंद्र शाळा खंडाळा येथे शिक्षण अधिकारी यांच्या सूचनेनुसार मतदान जनजागृती या बाबत विविध कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख साबळे मॅडम या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या की, मतदान हा आपला प्रमुख संविधानिक अधिकार असून आपण सर्वांनी याचा हक्क बजावला पाहिजे व आपले देशाप्रतीचे कर्तव्य पूर्ण केले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
यावेळेस आदर्श केंद्र शाळेतील विद्यार्थी , त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सर्व शिक्षक वृंद, परिसरातील पालक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळेस वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ संगिता भोसले यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना उद्देशून मतदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची मतदान जागृती रॅली शाळेपासून पासून ते नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी काढण्यात आली. प्रसंगी केंद्रप्रमुख सुनीता साबळे , नगरसेवक संदीप गाढवे तसेच अधीक्षक नगरपंचायत अजय सोळसकर उपस्थित होते.
या रॅली दरम्यान विद्याथ्यांनी मतदान जागृती विषयी घोषणा दिल्या. या रॅलीची सांगता केंद्र शाळा खंडाळा या ठिकाणी करण्यात आली..
यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मतदानाविषयी संकल्प पत्र देऊन पालकांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. मतदान जागृती दिनानिमित्त शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, निबंध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा तसेच किल्ले स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.