सोयाबीन पिकाला शेंगाच नाहीत; शेतकऱ्यांची कृषी विभागावर धडक:अकोला तालुक्यात शेतकरी हवालदिल

सोयाबीनला शेंगाच नसल्याचा प्रकार बाळापूरनंतर अकोला तालुक्यातही दिसून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचायत समितीवर धडक देत तेथील कृषी विभागाला निवेदन सादर केले. तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यंदा खरीप हंगामात अकोला तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने आधीच उत्पादन घटले. अशातच गत काही दिवसांपासून तालुक्यात प्रचंड पाऊस पडत आहे. हे कमी की काय सोयाबीन पिकाला एकही शेंग आली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाभुळगाव जहाँगीर सर्कलमध्ये गावांमध्ये संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगरगाव, बाभूळगाव, सिसा, मासा, सिसा उदेगाव, या गावातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील शेतकरी आपल्या शेतात दरवर्षी सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात करतात. सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या गंभीर बाबाची दखल शासनाने त्वरित घेऊन शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना योगेश नागापुरे, माणिकराव देवर, श्रीकृष्ण देवर, सुधाकर देशमुख, संजय देशमुख, राहुल काकडे, गणेश महादेवराव काकडे, गजानन वैराळे आदींसह शेतकरी होते. या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. ग्रामसभा बोलावून लवकरच घेणार ठराव सततच्या पावसामुळे डोंगरगाव परिसरातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने संबंधितांना अनेक वेळा माहिती दिली आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढलेला आहे. यासंदर्भातील शासनाने त्वरित सर्वे करुन शेतकऱ्यांना पिक विमा तसेच शासकीय मदत त्वरित द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतर्फे डोंगरगावचे उपसरपंच किशोर काकडे यांनी केली आहे. लवकरच यासंदर्भात ग्रामसभा बोलावून ग्राम सभेचा ठराव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. सर्वाधिक नुकसान अकोल्यात यंदा अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान अकोला तालुक्यात झाले आहे. जून व जुलैमध्ये ६ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या ६ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, तूर व उडीद पिकांची हानी झाले. त्यानंतर २ सप्टेंबर रोजीही जिल्ह्यात सर्वाधिक अकोला तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. हे नुकसान ५२ गावांमध्ये झाले.

​सोयाबीनला शेंगाच नसल्याचा प्रकार बाळापूरनंतर अकोला तालुक्यातही दिसून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचायत समितीवर धडक देत तेथील कृषी विभागाला निवेदन सादर केले. तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यंदा खरीप हंगामात अकोला तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने आधीच उत्पादन घटले. अशातच गत काही दिवसांपासून तालुक्यात प्रचंड पाऊस पडत आहे. हे कमी की काय सोयाबीन पिकाला एकही शेंग आली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाभुळगाव जहाँगीर सर्कलमध्ये गावांमध्ये संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगरगाव, बाभूळगाव, सिसा, मासा, सिसा उदेगाव, या गावातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील शेतकरी आपल्या शेतात दरवर्षी सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात करतात. सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या गंभीर बाबाची दखल शासनाने त्वरित घेऊन शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना योगेश नागापुरे, माणिकराव देवर, श्रीकृष्ण देवर, सुधाकर देशमुख, संजय देशमुख, राहुल काकडे, गणेश महादेवराव काकडे, गजानन वैराळे आदींसह शेतकरी होते. या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. ग्रामसभा बोलावून लवकरच घेणार ठराव सततच्या पावसामुळे डोंगरगाव परिसरातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने संबंधितांना अनेक वेळा माहिती दिली आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढलेला आहे. यासंदर्भातील शासनाने त्वरित सर्वे करुन शेतकऱ्यांना पिक विमा तसेच शासकीय मदत त्वरित द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतर्फे डोंगरगावचे उपसरपंच किशोर काकडे यांनी केली आहे. लवकरच यासंदर्भात ग्रामसभा बोलावून ग्राम सभेचा ठराव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. सर्वाधिक नुकसान अकोल्यात यंदा अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान अकोला तालुक्यात झाले आहे. जून व जुलैमध्ये ६ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या ६ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, तूर व उडीद पिकांची हानी झाले. त्यानंतर २ सप्टेंबर रोजीही जिल्ह्यात सर्वाधिक अकोला तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. हे नुकसान ५२ गावांमध्ये झाले.  

Share