पालघरमधील श्रीनिवास वनगा यांची नाराजी दूर:मुख्यमंत्री शिंदेंचे केले स्वागत, राजेंद्र गावीत यांच्या प्रचार सभेतही उपस्थित

पालघरमधील श्रीनिवास वनगा यांची नाराजी दूर:मुख्यमंत्री शिंदेंचे केले स्वागत, राजेंद्र गावीत यांच्या प्रचार सभेतही उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करणाऱ्या पालकांचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी त्यांची नाराजी दूर केल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे पालघरच्या हेलीपॅड वर श्रीनिवास वनगा यांनी स्वागत केले. तसेच महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत देखील श्रीनिवास वनगा उपस्थित होते. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांची नाराजी दूर करण्यात शिंदे यांना यश आले असल्याचे बोलले जात आहे. सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी लोकसभेमध्ये काहींना उमेदवारी देऊ शकलो नाही. परंतु त्यांना विधानसभेत ताबडतोब उमेदवारी दिली. आम्ही उठाव केला तेव्हा श्रीनिवास माझ्यासोबत होता. आता ही श्रीनिवासचा खर्च कार्यक्रम होता. तो बाजूला ठेवून याच मार्गाने तो आमच्या सोबत आला. श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहे. श्रीनिवास तू चांगलं होईल त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज नाही. दरम्यान 2022 मध्ये सुरतला जाताना श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण दाखवून पालघरच्या दिशेने गेले होते. मात्र याच श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी 39 आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली. फक्त श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या ऐवजी भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे श्रीनिवास नाराज होते. तसेच त्यांचा रडण्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास हे चार दिवस गायब झाले होते. ते आत्महत्या करण्याचा विचारात होते असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. उद्धव साहेब आमच्यासाठी देव होते. शिदेंसाहेंबावर विश्वास ठेवला ही आमची चूक झाली. 39 आमदारांचे पुनर्वसन केले, माझ्या पतीची काय चूक झाली, असा सवाल देखील त्यांच्या पत्नीने विचारलं होता.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment