राज्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या:नवल किशोर राम पुणे आयुक्तपदी; धुळे, अमरावतीला नवे जिल्हाधिकारी

राज्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या:नवल किशोर राम पुणे आयुक्तपदी; धुळे, अमरावतीला नवे जिल्हाधिकारी

राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून, आज आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर गेलेले वरिष्ठ अधिकारी नवल किशोर राम यांची पुन्हा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. शितल तेली-उगळे यांच्यावर क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जे. एस. पापळकर यांची बदली छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे. याआधी ते धुळे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी भाग्यश्री विसपुते यांची धुळे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सी. के. डांगे यांना आता मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची बदली बृहन्मुंबई जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे? 1. नवल किशोर राम (IAS:RR:2008) – आयुक्त, पुणे महानगरपालिका
2. शीतल तेली-उगले (IAS:RR:2009) – क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे
3. जे.एस. पापळकर (IAS:SCS:2010) – विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
4. सी.के. डांगे (IAS:SCS:2010) – सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग
5. सौरभ कटियार (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा
6. भाग्यश्री विसपुते (IAS:RR:2017) जिल्हाधिकारी, धुळे
7. आनंद भंडारी (IAS:NON-SCS:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद
8. आशिष येरेकर (IAS:RR:2018) जिल्हाधिकारी, अमरावती या आधी कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?
1. अभिषेक कृष्णा (आयएएस: आरआर: 2006) सदस्य सचिव, महा. जीवन प्राधिकरण मुंबई यांची संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. अविनाश पाठक (आयएएस: एससीएस: 2013) जिल्हाधिकारी, बीड यांना व्यवस्थापकीय संचालकपदी, मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.
3. विवेक जॉन्सन (आयएएस: आरआर: 2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर यांना बीड येथे नियुक्त करण्यात आले आहे.
4. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: 2019) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांना व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
5. पुलकित सिंग (आयएएस: आरआर: 2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, अंबड उपविभाग, जालना यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment