राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा:MPSC च्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीत, मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा:MPSC च्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीत, मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षा मराठीतून घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठी मध्ये घेण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. कृषी आणि अभियांत्रिकी विद्याशाखांसंदर्भातील काही परीक्षा इंग्रजीमध्येच घेतल्या जात असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जातील, अशी घोषणा केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या बऱ्याच परीक्षा या मराठीतून होत असतात. मात्र, अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नाहीत. या परीक्षा इंग्रजीमध्येच घेतल्या जातात. यासंदर्भात विधान परिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त माहिती दिली. नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? मूळात या ज्या परीक्षा आहेत, त्या मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये घेतो, पण न्यायालयाने आपल्याला असा एक निर्णय दिला होता की, त्यातील काही परीक्षा अशा आहेत. कृषी अभियांत्रिकीशी संबंधित ज्या परीक्षा आहे, त्या आपण मराठीत घेत नाहीत, इंग्रजीतच घेतो. न्यायालयासमोर हा विषय गेल्यानंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीत असा विषय आला की, याची पुस्तके काही उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते न्यायालयाच्याही निदर्शनास आणून देण्यात आले. न्यायालयानेही ते मान्य केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की, जरी याची पुस्तके उपलब्ध नसतील, तरीही नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीत घेण्याची मुभा मिळालेली आहे. म्हणून जे टेक्निकल कोर्सेस ज्याची एमपीएससी परीक्षा मराठीमध्ये घेत नाहीत. कारण त्याची पुस्तके उपलब्ध नाहीत. त्याची पुस्तके तयार करण्यात येतील. त्याचा एक कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल एमपीएससीशी बोलून आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मनुष्यबळ नसल्याने खाजगी कंपनीकडून परीक्षांचे नियोजन केले जात असल्याचे सांगत यात अपारदर्शकता पेपर फुटी आणि कॉपी तसेच गुणांमध्ये तफावत असल्याचे गैरप्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत. याबाबत विचारणा केली असता, पेपर फुटी कॉपी मार्कांमधील तफावत हे प्रकार आणि खाजगी कंपनीकडून परीक्षांचे नियोजन करणे यांचा संबंध नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment