सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर:तर्कतीर्थ, मर्ढेकरांना मिळलेला सर्वोच्च पुरस्कार मिळाला म्हणत रसाळांनी व्यक्त केला आनंद!

सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर:तर्कतीर्थ, मर्ढेकरांना मिळलेला सर्वोच्च पुरस्कार मिळाला म्हणत रसाळांनी व्यक्त केला आनंद!

साहित्य अकादमीच्या वतीने दिला जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक सुधीर रसाळ यांचा नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे. ‘विंदांचे गद्यरूप’ या सुधीर रसाळ यांनी लिहिलेल्या पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर्थतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बा. सी. मर्ढेकर यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार मला मिळाला म्हणत सुधीर रसाळ यांनी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना आनंद व्यक्त केला. मराठी भाषेला याच वर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यात आता सुधीर रसाळ यांच्या माध्यमातून मराठी भाषेचा पुन्हा एकदा देश पातळीवर गौरव करण्यात आला आहे. साहित्य अकादमीच्या वतीने वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये आठ काव्यसंग्रह, तीन कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन साहित्यिक समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. बंगाली, डोगरी आणि उर्दू भाषेतील पुरस्कार नंतर जाहीर केले जाणार आहेत. 21 भारतीय भाषांच्या निवड समित्यांनी या पुरस्कारांची शिफारस केली होती आणि आज साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांना मान्यता देण्यात आली. हे पुरस्कार पुरस्कार वर्षाच्या गेल्या पाच वर्षांत (म्हणजे 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान) प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना दिले जातात. 8 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. ताम्रपट, शाल आणि 1 लाख रुपयांचा पुरस्कार पुरस्कारार्थींना प्रदान केला जाणार आहे. माझ्यासाठी सर्वेश्रेष्ठ पुरस्कार हा सर्वात श्रेष्ठ पुरस्कार असल्याचे मी मानतो. आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. बा. सी. मर्ढेकर, प्रभाकर पाध्ये अशा फार मोठ्या विचारवंत समीक्षकांना जो पुरस्कार मिळाला, तो मलाही मिळतो आहे. याचा मला विशेष आनंद असल्याचे सुधीर रसाळ यांनी ‘दिव्य मराठी’ बोलताना म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment