सुनील पाटील यांचे प्रतिपादन‎:मानाचे गणपती वेळेवर हजर न राहिल्यास अन्य मंडळाच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक

सुनील पाटील यांचे प्रतिपादन‎:मानाचे गणपती वेळेवर हजर न राहिल्यास अन्य मंडळाच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक

पाथर्डी विसर्जन मिरवणुकीसाठी मानाचे गणपती नियोजित वेळी हजर न राहिल्यास अन्य मंडळाच्या उपस्थितीत मिरवणूक नियोजित वेळी सुरू केली जाईल. मंडळांनी वेळेवर मिरवणूक स्थळी यावे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी केले. गणेशविसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या वेळी विसर्जन मार्गात येणारे अडथळे त्यावर उपाययोजनेसाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या. या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिले. विसर्जन मार्गावरील वाहतूक अडथळे दूर करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी त्यांच्या ताफ्यासह बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पाहणी केली. वीर सावरकर मैदान, गांधी चौक, जय भवानी चौक, मार्गे कसबा विभागातील मार्गावरून पायी दौरा करुन मोहरी रोड वरील गाडगे अमराई येथील कृषी विभागाच्या गणेश विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरीची व परिसराची ही संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकांकडूनही कारवाई करण्यात येणार आहे. मद्य प्राशन करून मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी पाथर्डीतील मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार उद्धव नाईक, निरीक्षक संतोष मुटकुळे उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. महावितरण, पालिका बांधकाम विभाग, आपत्ती व्यपस्थापन विभाग आणि संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे व बेशिस्तपणे पार्किंग होणाऱ्या गाड्यांवर, विना नंबर प्लेट असणाऱ्या गाड्यांवर कारवाई होणार आहे.

​पाथर्डी विसर्जन मिरवणुकीसाठी मानाचे गणपती नियोजित वेळी हजर न राहिल्यास अन्य मंडळाच्या उपस्थितीत मिरवणूक नियोजित वेळी सुरू केली जाईल. मंडळांनी वेळेवर मिरवणूक स्थळी यावे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी केले. गणेशविसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या वेळी विसर्जन मार्गात येणारे अडथळे त्यावर उपाययोजनेसाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या. या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिले. विसर्जन मार्गावरील वाहतूक अडथळे दूर करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी त्यांच्या ताफ्यासह बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पाहणी केली. वीर सावरकर मैदान, गांधी चौक, जय भवानी चौक, मार्गे कसबा विभागातील मार्गावरून पायी दौरा करुन मोहरी रोड वरील गाडगे अमराई येथील कृषी विभागाच्या गणेश विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरीची व परिसराची ही संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकांकडूनही कारवाई करण्यात येणार आहे. मद्य प्राशन करून मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी पाथर्डीतील मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार उद्धव नाईक, निरीक्षक संतोष मुटकुळे उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. महावितरण, पालिका बांधकाम विभाग, आपत्ती व्यपस्थापन विभाग आणि संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे व बेशिस्तपणे पार्किंग होणाऱ्या गाड्यांवर, विना नंबर प्लेट असणाऱ्या गाड्यांवर कारवाई होणार आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment