तामिळनाडूने पात्र शेतकऱ्यांची नावे द्यावीत, ती जोडू- शिवराज:किसान निधीवर केंद्रीय कृषी मंत्र्यांचे उत्तर

लोकसभेत मंगळवारी तामिळनाडूच्या एका खासदाराने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेवरून प्रश्न विचारला. या प्रश्नाच्या उत्तरात कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, मी तामिळनाडू सरकारला विनंती करतो की, कुणी पात्र लाभार्थी असेल तर पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित असेल तर त्यांनी नाव पोर्टलवर अपडेट करावे. त्यांचे नाव निश्चितपणे जोडले जाईल. तामिळनाडूत असे जवळपास १४ हजार शेतकरी आहे. राज्य सरकारने छाननी करून यादी पाठवावी, मी आश्वस्त करतो की, येथून एक दिवसही उशीर होणार नाही.द्रमुक खासदारांनी आरोप लावला की, केंद्र सरकार तामिळनाडूच्या शेतकऱ्यांसोबत अन्याय करत आहे. यावर सिंह म्हणाले, मी दोन वेळा तामिळनाडू गेलो आहे. केंद्राने इशारा दिला की, मनरेगा निधीचा दुरुपयोग झाला किंवा योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशानिर्देशांचे पालन न झाल्यास कडक कारवाई केली जाईल. २०२६ पर्यंत २०० डे कॅन्सर सेंटर- नड्डा आरोग्यमंत्री जेपी नड्डा राज्यसभेत म्हणाले, सरकारचे उद्दिष्ट २०२५-२६ पर्यंत देशात २०० डे कॅन्सर केयर सेंटर उघडण्याचे आहे. जेथे रुग्णांना पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आणि येत्या ३ वर्षांत सर्व जिल्ह्यांत अशी केंद्रे स्थापित केले जातील. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत फसवणूक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यसभेत सांगितले की, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेअंतर्गत फसवणूक करणाऱ्याविरुद्ध ६४३ कोटी रु.चे ३.५६ लाख दावे फेटाळण्याची कारवाई केली आहे. महाराष्ट्रात जीबीएसचे २२४ रुण : महाराष्ट्रातील पुण्यासह विविध शहरात ३ मार्चपर्यंत गिलियन-बॅर-सिंड्रोमचे(जीबीएस) २२४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला. भारत-बांगलादेश सीमा: २०२४ मध्ये बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर तस्करीचा प्रयत्न निष्फळ करत ४६१.०७ कोटी रुपये मूल्याची प्रतिबंधित सामग्री जप्त केली. ही गेल्या दहा वर्षांदरम्यान सर्वात जास्त आहे.