टंचाईची चिंता दूर:जायकवाडी 97 टक्क्यांवर; 5 जिल्ह्यांत 550 गावांचा पाणीप्रश्न 2 वर्षे मिटला‎;  धरणातून यंदा प्रथमच विसर्ग होणार, 18 हजार क्युसेकने आवक‎

टंचाईची चिंता दूर:जायकवाडी 97 टक्क्यांवर; 5 जिल्ह्यांत 550 गावांचा पाणीप्रश्न 2 वर्षे मिटला‎;  धरणातून यंदा प्रथमच विसर्ग होणार, 18 हजार क्युसेकने आवक‎

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह‎जायकवाडी धरणाच्या वरील भागात जोरदार‎पाऊस सुरू आहे. यामुळे जायकवाडी धरणात‎रविवारी सायंकाळी ६ वाजता १८,०७२ क्युसेक‎वेगाने आवक सुरू होती. सध्या धरणाचा‎साठा ९७ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे‎मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,‎जालना, बीड, परभणी आणि नांदेड या पाच‎जिल्ह्यांमधील ५५० गावे आणि ५० लाख‎लोकसंख्येचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न दोन‎वर्षांसाठी सुटला आहे. जायकवाडीतून २४‎तासांत विसर्ग होण्याची शक्यता आहे.‎ धरणाचा साठा वाढत असल्याने खबरदारी ‎‎म्हणून कोणत्याही क्षणी धरणाच्या मुख्य‎गेटमधून, गोदावरी नदीच्या पात्रात पाणी‎सोडले जाणार आहे. या संदर्भातील निर्णय ‎‎सोमवारी ९ रोजी सकाळी घेतला जाईल, असे ‎‎धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, ‎‎अभियंता गणेश खराकडर यांनी सांगितले. ‎‎धरणातून विसर्गाची शक्यता लक्षात घेऊन, ‎‎गोदावरी काठावरील गावे आणि शहरांना ‎‎सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्या‎पात्रालगत कोणीही जाऊ नाही, असे आवाहन ‎‎करण्यात आले आहे. पैठणसह जालना ‎‎जिल्ह्यातील गोदाकाठच्या नागरिकांनी‎शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेती अवजारे ‎‎तसेच पाळीव प्राणी, गुरांना सुरक्षित स्थळी‎हलवावे, मालाची अथवा जीवितहानी होणार‎नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना‎प्रशासनाने दिल्या आहेत. रविवारी सुटीची‎पर्वणी साधून धरणावर दिवसभरात दोन‎हजारांवर पर्यटकांनी भेट दिली.‎ दिव्य मराठी एक्सप्लेनर‎ – विजय काकडे, शाखा अभियंता, जायकवाडी‎ Q विसर्गाचा फायदा काय?‎
A मराठवाडा ५ जिल्ह्यांसह विदर्भ,‎तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना याच लाभ‎होईल. नांदेडचा बाभळी बंधारा पूर्ण‎क्षमतेने भरेल. त्यामुळे तेलंगणातही पाणी‎सोडले जाईल. तसेच भूजलपातळी‎वाढीला यामुळे चालना मिळेल.‎

Q धरणातून आजवर किती वेळा‎विसर्ग झाला?‎
A १९७३ मध्ये निर्मिती पूर्ण झाल्यानंतर‎धरणातून आजवर २२ वेळा विसर्ग झाला‎आहे. यंदाही साठा पूर्ण झाल्यामुळे विसर्ग‎होणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात निर्माण‎होणाऱ्या टंचाईवर मात करता येईल.‎

Q शेतीसाठी वाढीव जलसाठ्याचा‎उपयोग कसा होणार?‎
A जायकवाडी धरण यंदा पूर्ण भरल्याने‎रब्बीसाठी ७ आवर्तने देण्याचा मार्ग‎मोकळा झाला आहे. त्यामुळे‎मराठवाड्यात बागायती शेतीचे क्षेत्र‎वाढेल. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात‎गरजेच्या वेळी पाणी मिळेल. तसेच त्या‎वेळची गरज ओळखून आवर्तन देण्याचा‎निर्णय घेतला जाईल.‎ पुढे काय? : १५ सप्टेंबरपर्यंत ९९.१४ टक्के साठा राखणार‎
धरणाच्या प्रचलन आराखड्यानुसार १ ते १५‎सप्टेंबर या काळात जायकवाडीत ९९.१४‎टक्के साठा ठेवावा लागतो. त्यापेक्षा अधिक‎साठा झाल्यास धरणातून विसर्ग केला जातो.‎आता तशीच परिस्थिती असल्याने विसर्ग‎करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.‎

२ वर्षांनंतर होणार विसर्ग‎
मागील वर्षी याच दिवसात‎धरणाचा साठा ३२.४२ टक्के होता.‎दोन वर्षांपूर्वी धरण जुलैमध्ये १००‎टक्के भरल्याने, २८ जुलै २०२२‎रोजी धरणाचे १८ दरवाजे उघडून‎पाणी सोडले गेले होते, तर यंदा‎जायकवाडी धरण ८ आॅगस्टला ९७‎टक्के भरले आहे. यामुळे सोमवारी‎पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला‎जाणार आहे, अशी माहिती‎धरणाच्या अभियंत्यांनी दिली.‎

या धरणांतून आवक ‎(क्युसेकमध्ये) ‎

​गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह‎जायकवाडी धरणाच्या वरील भागात जोरदार‎पाऊस सुरू आहे. यामुळे जायकवाडी धरणात‎रविवारी सायंकाळी ६ वाजता १८,०७२ क्युसेक‎वेगाने आवक सुरू होती. सध्या धरणाचा‎साठा ९७ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे‎मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,‎जालना, बीड, परभणी आणि नांदेड या पाच‎जिल्ह्यांमधील ५५० गावे आणि ५० लाख‎लोकसंख्येचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न दोन‎वर्षांसाठी सुटला आहे. जायकवाडीतून २४‎तासांत विसर्ग होण्याची शक्यता आहे.‎ धरणाचा साठा वाढत असल्याने खबरदारी ‎‎म्हणून कोणत्याही क्षणी धरणाच्या मुख्य‎गेटमधून, गोदावरी नदीच्या पात्रात पाणी‎सोडले जाणार आहे. या संदर्भातील निर्णय ‎‎सोमवारी ९ रोजी सकाळी घेतला जाईल, असे ‎‎धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, ‎‎अभियंता गणेश खराकडर यांनी सांगितले. ‎‎धरणातून विसर्गाची शक्यता लक्षात घेऊन, ‎‎गोदावरी काठावरील गावे आणि शहरांना ‎‎सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्या‎पात्रालगत कोणीही जाऊ नाही, असे आवाहन ‎‎करण्यात आले आहे. पैठणसह जालना ‎‎जिल्ह्यातील गोदाकाठच्या नागरिकांनी‎शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेती अवजारे ‎‎तसेच पाळीव प्राणी, गुरांना सुरक्षित स्थळी‎हलवावे, मालाची अथवा जीवितहानी होणार‎नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना‎प्रशासनाने दिल्या आहेत. रविवारी सुटीची‎पर्वणी साधून धरणावर दिवसभरात दोन‎हजारांवर पर्यटकांनी भेट दिली.‎ दिव्य मराठी एक्सप्लेनर‎ – विजय काकडे, शाखा अभियंता, जायकवाडी‎ Q विसर्गाचा फायदा काय?‎
A मराठवाडा ५ जिल्ह्यांसह विदर्भ,‎तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना याच लाभ‎होईल. नांदेडचा बाभळी बंधारा पूर्ण‎क्षमतेने भरेल. त्यामुळे तेलंगणातही पाणी‎सोडले जाईल. तसेच भूजलपातळी‎वाढीला यामुळे चालना मिळेल.‎

Q धरणातून आजवर किती वेळा‎विसर्ग झाला?‎
A १९७३ मध्ये निर्मिती पूर्ण झाल्यानंतर‎धरणातून आजवर २२ वेळा विसर्ग झाला‎आहे. यंदाही साठा पूर्ण झाल्यामुळे विसर्ग‎होणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात निर्माण‎होणाऱ्या टंचाईवर मात करता येईल.‎

Q शेतीसाठी वाढीव जलसाठ्याचा‎उपयोग कसा होणार?‎
A जायकवाडी धरण यंदा पूर्ण भरल्याने‎रब्बीसाठी ७ आवर्तने देण्याचा मार्ग‎मोकळा झाला आहे. त्यामुळे‎मराठवाड्यात बागायती शेतीचे क्षेत्र‎वाढेल. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात‎गरजेच्या वेळी पाणी मिळेल. तसेच त्या‎वेळची गरज ओळखून आवर्तन देण्याचा‎निर्णय घेतला जाईल.‎ पुढे काय? : १५ सप्टेंबरपर्यंत ९९.१४ टक्के साठा राखणार‎
धरणाच्या प्रचलन आराखड्यानुसार १ ते १५‎सप्टेंबर या काळात जायकवाडीत ९९.१४‎टक्के साठा ठेवावा लागतो. त्यापेक्षा अधिक‎साठा झाल्यास धरणातून विसर्ग केला जातो.‎आता तशीच परिस्थिती असल्याने विसर्ग‎करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.‎

२ वर्षांनंतर होणार विसर्ग‎
मागील वर्षी याच दिवसात‎धरणाचा साठा ३२.४२ टक्के होता.‎दोन वर्षांपूर्वी धरण जुलैमध्ये १००‎टक्के भरल्याने, २८ जुलै २०२२‎रोजी धरणाचे १८ दरवाजे उघडून‎पाणी सोडले गेले होते, तर यंदा‎जायकवाडी धरण ८ आॅगस्टला ९७‎टक्के भरले आहे. यामुळे सोमवारी‎पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला‎जाणार आहे, अशी माहिती‎धरणाच्या अभियंत्यांनी दिली.‎

या धरणांतून आवक ‎(क्युसेकमध्ये) ‎  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment