तरुणांना संधी द्या पण सीनियर लोकांसाठी जागा ठेवायला हव्यात:विधानसभेच्या निवडणुकीत उभे केलेच कशाला? छगन भुजबळ यांचा सवाल

तरुणांना संधी द्या पण सीनियर लोकांसाठी जागा ठेवायला हव्यात:विधानसभेच्या निवडणुकीत उभे केलेच कशाला? छगन भुजबळ यांचा सवाल

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच ओबीसी नेत्यांनी भुजबळ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेत चर्चा देखील केली आहे. या नंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळाले तसेच त्यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर छगन भुजबळ यांचा फोटो मात्र वगळण्यात आला होता. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, लाखो गरिबांच्या हृदयात आपला फोटो असणे ही बाब माझ्यासाठी पुरेशी आहे. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचे मत ओबीसी नेत्यांचे झाले आहे. ओबीसी समाजातील विविध नेत्यांनी आपली भेट घेतली आणि त्यांनी आपल्यासोबत असल्याचे सांगितले. तुम्ही बाहेर असल्याने आम्ही त्रस्त असल्याचे त्यांनी मला सांगितले, अशी माहिती भुजबळांनी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत उभे केलेच कशाला?
छगन भुजबळ म्हणाले, मी लोकसभेची तयारी केली होती. पण त्यावेळी मला थांबवण्यात आले. त्यानंतर राज्यसभेच्या दोन जागांवर संधी होती. पण त्यावेळीही मला तुमची राज्यात गरज आहे असे सांगत थांबवण्यात आले. मग आता गरज संपली का? मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्यासाठी आपल्याला थांबवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पण तरुणपणाचे वय काय आहे? तरुणांना संधी द्या पण काही जागा सिनिअर लोकांसाठी ठेवायला हव्यात ना. आधीच सांगायचे ना विधानसभेला उभे राहू नका म्हणून, असे म्हणत त्यांनी त्यांची नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे. राज्यसभेवर जा म्हणणे म्हणजे विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मग उभे केलेच कशाला? असा सवाल देखील त्यांनी अजित पवारांना उद्देशून केला आहे. छगन भुजबळ म्हणाले, मी ओबीसींसाठी लढणारा नेता आहे. 35 वर्षे ओबीसींसाठी लढतोय. मराठा समाजाचा द्वेष करत नाही. त्यांना वेगळे आरक्षण द्यावे अशी मागणी आहे. मी मराठा समाजाचा विरोधक नाही. पण तसे चित्र निर्माण केले गेले. ओबीसींसाठी लढताना कुठल्याही इतर समाजाच्या हक्कांवर गदा आणू दिली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment