‘ते ठाकरे असले तर मी देखील राऊत’:संजय राऊत यांचा थेट राज ठाकरे यांना इशारा; भाजपच्या नादी लागलेला काय बोलणार? म्हणत पलटवार

‘ते ठाकरे असले तर मी देखील राऊत’:संजय राऊत यांचा थेट राज ठाकरे यांना इशारा; भाजपच्या नादी लागलेला काय बोलणार? म्हणत पलटवार

मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाकरे असले तरी मी देखील राऊत आहे, माझे बरेच आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत गेले आहे. बाळासाहेबांनीच घडवलेला मी राऊत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी मला शिकवण्याची आवश्यकता नसल्यााचे राऊत यांनी म्हटले आहे. ज्याला जी भाषा समजते, ती भाषा मी वापरत असल्याचे राऊत त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे बोलत असलेली स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरेंवर ईडीची टांगती तलवार असल्याने त्यांना हे बोलावे लागत असल्याचे देखील राऊत म्हणाले. भाजपच्या नादी लागलेला अजून काय बोलणार? अशा शब्दात त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. राज ठाकरे ज्या ठिकाणी बोलले तिथे गुंडांच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. अशा गुंडांना वर्षा बंगल्यावरुन सूचना येत असल्याा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. या माध्यमातून संजय चौधरी यांनी यांच्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. सत्ताधारी पक्षाचे नेते गुंडांच्या मदतीने निवडणुका लढवत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. प्रत्युक मतदारसंघासाठी स्वतंत्र गुंडांची नियुक्ती केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुंडांना वापरून शिंदेंचे आणि भाजपचे लोक निवडणुका लढवत असतील तर जे घडणार आहे त्याची सर्व जबाबदारी पोलिसांवर असेल, अशा शब्दात राऊत त्यांनी टीका केली. आम्ही महाराष्ट्रात नक्कीच सेफ शिवसेनेतील सहकार्यांना मोदी यांनी वेगळे केले. राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मोदी यांनी वेगळे केले, त्यामुळे आपण काय बोलत आहोत हे आधी मोदी आणि शहा यांनी समजून घ्यावे असे शब्दात, ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या मोदी यांच्या नाऱ्याचा राऊत यांनी समचार घेतला. अशाप्रकारे बोलण्याची वेळ पंतप्रधानांवर का यावी? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही महाराष्ट्रात नक्कीच सेफ आहोत मोदी-शहा आल्यानंतरच आम्ही अनसेफ होत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांचे अवतार कार्य आता भारतीय जनता पक्ष संपवणार आहे. तसेच ते संपवायला सुरुवात देखील झाली आहे. याचा अर्थ फडणवीस मुख्यमंत्री होतील असा नाही. मुख्यमंत्री तर महाविकास आघाडीचाच होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील:केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे स्पष्ट संकेत; राजकीय वर्तुळात चर्चा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभेत आगामी काळात महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे भाषण करताना अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत तेच मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच आणायचे, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री पदाबाबत चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment