ठाकरे सेनेचे पदाधिकारी शिंदे सेनेत

ठाकरे सेनेचे पदाधिकारी शिंदे सेनेत

अहिल्यानगर तालुक्यातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सरपंच अशा १५ पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाची वाट धरली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ते मुंबईला रवाना झाले आहेत. माळीवाडा बसस्थानकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हे सर्व पदाधिकारी बुधवारी मुंबईकडे रवाना झाले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव यांच्यासह बाबुशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते. यापूर्वीही शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) १५ नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता नगर तालुक्यातील बहुतांश पदाधिकारी शिंदे गटात गेल्याने अहिल्यानगर शहरासह तालुक्यातही ठाकरे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संदेश तुकाराम कार्ले (उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य), शरद मधुकर झोडगे (माजी जिल्हा परिषद सदस्य), रामदास रंगनाथ भोर (माजी सभापती, पंचायत समिती), डॉ. दिलीप दत्तात्रय पवार (माजी उपसभापती, पंचायत समिती), गुलाब शिंदे (पंचायत समिती सदस्य), प्रकाश कुलट (उपतालुका प्रमुख), विठ्ठल हंडोरे (सरपंच, घोसपुरी), बाबासाहेब भोर (चेअरमन, भोरवाडी), नवनाथ वायाळ, बाबासाहेब टकले, अशोक दहिफळे, सुरेश क्षीरसागर, विठ्ठलराव जाधव, शरदराव शेडाळे (भारतीय कामगार सेना), संजय आव्हाड (वाहतूक सेना) आदी प्रवेशासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment