जाती-धर्मापेक्षा श्रीरामपूरच्या विकासाला जास्त महत्त्व द्यावे:राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांचा सल्ला

जाती-धर्मापेक्षा श्रीरामपूरच्या विकासाला जास्त महत्त्व द्यावे:राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांचा सल्ला

माझ्या बालपणीचे श्रीरामपूर खूप वेगळे होते. आज श्रीरामपूर खूप बदलले आहे. जातीय अन् धार्मिक तेढ आणि दूषित वातावरण बघून दुःख झाले. विकासापेक्षा धर्म व जात याला जास्त महत्त्व आले. बाहेरचे लोक येऊन स्थानिक लोकांना उकसवत असतील, तर ते स्थानिक लोकांचे अपयश आहे. स्थानिक लोकांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा सामाजिक एकता, सांस्कृतिक व साहित्यिक वारसा असणारे श्रीरामपूर पुन्हा उभे व्हावे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी व श्रीरामपूरचे भूमिपुत्र डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये वकील, डॉक्टर, पत्रकार, राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत लोकशाही चर्चा या उपक्रमात संवाद करताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, हेमलता वाकडे, सुनीता दिमटे, सुनीता कल्हापुरे, बाबासाहेब गोसावी, डॉ. संजय अनारसे आदी उपस्थित होते. शहराची दिशा भरकटत चालली आहे- कुलकर्णी डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, काळानुरूप बदल होत असतो. मात्र त्याची दिशा महत्त्वाची असते. पण आपल्या शहराची दिशा भरकटत चालली आहे. सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन विधायक कामांची मालिका उभी करावी. गावातील वातावरण चांगले राहावे, याची जबाबदारी घ्यावी लागेल. सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक नेतृत्व निर्माण व्हावे, सामाजिक वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी. अधिकारांबद्दल आपण जास्त सजग झालो आहोत. शहरात स्वच्छता, रहदारीला अडथळे आणणे असे अतिक्रमण झाले. कान धरून समजून सांगणारी माणसं कमी झाली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी कायदा सुव्यव्यवस्था राखणे ही जबाबदारी सर्वांची आहे. मात्र काहीजण जाणीवपूर्वक कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत पोलिस प्रशासन सतर्क झाले असून कारवाई सुरू करण्यात आली. याबाबत तडजोड करणार नाही, असा इशारा दिला आहे. दरम्यान, भि. रा. खटोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. मतदान जनजागृतीबाबत पोस्टर्स व स्टिकर्सचे प्रकाशन करण्यात आले. 5 वर्षीय ओवी प्रसाद काळे हिने लोकशाहीचा प्रवास यावर पोवाडा सादर केला. यात धर्म, जात, पैसा, बाटलीमध्ये निवडणूक अडकली. सत्ता ठरवणारे जागरूक आहेत का? जागरूक मतदार लोकशाहीचा खरा आधार, त्यांना निवडून देणाऱ्या जनतेने भ्रष्ट होऊ नये, जागरूक असावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रांताधिकारी किरण सावंत यांनी केले. सूत्रसंचालन गणेश पिंगळे यांनी केले.

​माझ्या बालपणीचे श्रीरामपूर खूप वेगळे होते. आज श्रीरामपूर खूप बदलले आहे. जातीय अन् धार्मिक तेढ आणि दूषित वातावरण बघून दुःख झाले. विकासापेक्षा धर्म व जात याला जास्त महत्त्व आले. बाहेरचे लोक येऊन स्थानिक लोकांना उकसवत असतील, तर ते स्थानिक लोकांचे अपयश आहे. स्थानिक लोकांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा सामाजिक एकता, सांस्कृतिक व साहित्यिक वारसा असणारे श्रीरामपूर पुन्हा उभे व्हावे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी व श्रीरामपूरचे भूमिपुत्र डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये वकील, डॉक्टर, पत्रकार, राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत लोकशाही चर्चा या उपक्रमात संवाद करताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, हेमलता वाकडे, सुनीता दिमटे, सुनीता कल्हापुरे, बाबासाहेब गोसावी, डॉ. संजय अनारसे आदी उपस्थित होते. शहराची दिशा भरकटत चालली आहे- कुलकर्णी डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, काळानुरूप बदल होत असतो. मात्र त्याची दिशा महत्त्वाची असते. पण आपल्या शहराची दिशा भरकटत चालली आहे. सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन विधायक कामांची मालिका उभी करावी. गावातील वातावरण चांगले राहावे, याची जबाबदारी घ्यावी लागेल. सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक नेतृत्व निर्माण व्हावे, सामाजिक वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी. अधिकारांबद्दल आपण जास्त सजग झालो आहोत. शहरात स्वच्छता, रहदारीला अडथळे आणणे असे अतिक्रमण झाले. कान धरून समजून सांगणारी माणसं कमी झाली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी कायदा सुव्यव्यवस्था राखणे ही जबाबदारी सर्वांची आहे. मात्र काहीजण जाणीवपूर्वक कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत पोलिस प्रशासन सतर्क झाले असून कारवाई सुरू करण्यात आली. याबाबत तडजोड करणार नाही, असा इशारा दिला आहे. दरम्यान, भि. रा. खटोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. मतदान जनजागृतीबाबत पोस्टर्स व स्टिकर्सचे प्रकाशन करण्यात आले. 5 वर्षीय ओवी प्रसाद काळे हिने लोकशाहीचा प्रवास यावर पोवाडा सादर केला. यात धर्म, जात, पैसा, बाटलीमध्ये निवडणूक अडकली. सत्ता ठरवणारे जागरूक आहेत का? जागरूक मतदार लोकशाहीचा खरा आधार, त्यांना निवडून देणाऱ्या जनतेने भ्रष्ट होऊ नये, जागरूक असावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रांताधिकारी किरण सावंत यांनी केले. सूत्रसंचालन गणेश पिंगळे यांनी केले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment