गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न:मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला, थेट हेलिकॉप्टरने आणले रक्त

गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न:मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला, थेट हेलिकॉप्टरने आणले रक्त

गडचिरोली येथील आरोग्य विभागावर सर्वच स्तरातून टीका होतानाच येथील आरोग्य यंत्रणेची संवेदनशीलता समोर आली आहे. एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली, यावेळी तिला रक्तस्त्राव झाला. अशा परिस्थितीत महिलेचे प्राण वाचवण्याचे म्हणजे एक आव्हानच होते आणि त्यात मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटलेला होता. मात्र अशा परिस्थितीत महिलेचे प्राण वाचवण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने गावात रक्त पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य यंत्रणेची कौतुकास्पद कामगिरी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आरेवाडा गावात मातोश्री चौधरी नामक गर्भवती महिलेची नुकतीच प्रसूती झाली. प्रसूतीवेळी रक्तस्त्राव झाला. त्यामुळे रक्तअभावी महिलेचा जीवच धोक्यात आला होता. अशा परिस्थितीमध्ये येथील आरोग्य यंत्रणेने चक्रे फिरवली. मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला होता, अशा परिस्थितीमध्ये हेलिकॉप्टरने रक्त आणायचे हा एकमेव पर्याय उरला होता. त्यानुसार या गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची तातडीने व्यवस्था करण्यात आली. भामरागाड येथून रक्त घेऊन हेलिकॉप्टर आरेवाडा गावात आले व आरोग्य केंद्राच्या आवारातच ते उतरवण्यात आले. रक्त मिळताच गर्भवती महिलेचे प्राण वाचले व सुखरूपपणे या महिलेची प्रसूती झाली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे बाळाचा जन्मही अगदी सुखरूप झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. या घटनेनंतर आरोग्य विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या या भागात सर्वत्र पावसामुळे पूरसादृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांचा संपर्कही तुटला आहे. गडचिरोली आरोग्य यंत्रणेवर टीका गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच दोन मुलांचा जीव गेल्याची बातमी समोर आली होती. यात आई-वडिलांना मुलांच्या जिवासाठी 15 किमी चिखल तुडवत पायपीट करावी लागली होती. साध्या वाहनांची सोय देखील या भागात नव्हती. दुसऱ्या एका घटनेत एका तरुणाचे वडील शेतात पडले, तेव्हा त्यांच्या उपचारासाठी त्यांना झोळीत न्यावे लागले. पुढे नदीला पूर आल्याने नावेतून नेण्यात आले. एकंदरीतच गडचिरोली येथील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असल्याने सर्वच स्तरातून टीका होत आहे.

​गडचिरोली येथील आरोग्य विभागावर सर्वच स्तरातून टीका होतानाच येथील आरोग्य यंत्रणेची संवेदनशीलता समोर आली आहे. एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली, यावेळी तिला रक्तस्त्राव झाला. अशा परिस्थितीत महिलेचे प्राण वाचवण्याचे म्हणजे एक आव्हानच होते आणि त्यात मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटलेला होता. मात्र अशा परिस्थितीत महिलेचे प्राण वाचवण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने गावात रक्त पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य यंत्रणेची कौतुकास्पद कामगिरी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आरेवाडा गावात मातोश्री चौधरी नामक गर्भवती महिलेची नुकतीच प्रसूती झाली. प्रसूतीवेळी रक्तस्त्राव झाला. त्यामुळे रक्तअभावी महिलेचा जीवच धोक्यात आला होता. अशा परिस्थितीमध्ये येथील आरोग्य यंत्रणेने चक्रे फिरवली. मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला होता, अशा परिस्थितीमध्ये हेलिकॉप्टरने रक्त आणायचे हा एकमेव पर्याय उरला होता. त्यानुसार या गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची तातडीने व्यवस्था करण्यात आली. भामरागाड येथून रक्त घेऊन हेलिकॉप्टर आरेवाडा गावात आले व आरोग्य केंद्राच्या आवारातच ते उतरवण्यात आले. रक्त मिळताच गर्भवती महिलेचे प्राण वाचले व सुखरूपपणे या महिलेची प्रसूती झाली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे बाळाचा जन्मही अगदी सुखरूप झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. या घटनेनंतर आरोग्य विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या या भागात सर्वत्र पावसामुळे पूरसादृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांचा संपर्कही तुटला आहे. गडचिरोली आरोग्य यंत्रणेवर टीका गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच दोन मुलांचा जीव गेल्याची बातमी समोर आली होती. यात आई-वडिलांना मुलांच्या जिवासाठी 15 किमी चिखल तुडवत पायपीट करावी लागली होती. साध्या वाहनांची सोय देखील या भागात नव्हती. दुसऱ्या एका घटनेत एका तरुणाचे वडील शेतात पडले, तेव्हा त्यांच्या उपचारासाठी त्यांना झोळीत न्यावे लागले. पुढे नदीला पूर आल्याने नावेतून नेण्यात आले. एकंदरीतच गडचिरोली येथील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असल्याने सर्वच स्तरातून टीका होत आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment