हिंजवडी परिसरात एका मिनी बसला आग:बसमध्ये एकूण 12 कामगार; चार जणांचा होरपळून मृत्यू तर दोन जण जखमी

पुणे शहरातील हिंजवडी परिसरात एका मिनी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी या संबंधीची माहिती दिली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला ही आग लागली. यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण जखमी आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. या बसमध्ये एकूण 12 कामगार होते. मात्र, मागचा दरवाजा न उघडल्याने ही चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….