महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीसमोर माना झुकावल्या:त्यांनी राज्याच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारु नये, संजय राऊत यांचा महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल

राज्यातील कोणत्या नेत्याकडे काय जबाबदारी द्यायची हे दिल्लीत ठरत आहे. मुख्यमंत्री, प्रशासन, पोलिस आयुक्त, व्यापार कुणी काय करावा हे सर्व दिल्लीतील नेतृत्व ठरवत आहे. अन् महाराष्ट्रातील नेते त्यांच्यासमोर माना झुकवून उभे आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर राज्यात ठरत नसेल आणि कुणा एका राज्याच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्रीपद अन् सरकार ठरवले जात असेल तर या सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारु नये. शिंदेंना जे हवे ते मिळणार नाही संजय राऊत म्हणाले की, महायुतीत 3 पक्ष एकत्र आहेत. त्यांत भाजपला 132 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 50 हून अधिक तर अजित पवारांच्या पक्षाला 40 हून अधिक उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ वाटप कसे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरंक्षण मंत्रीपदही मागू शकतात. यांचे तुम्ही काही मनावर घेऊ नका. जर दिल्लीने डोळे वटारले तर हे शांत होतील. मग ते अजितदादा असो की एकनाथ शिंदे कारण ते शरणागत आहे. त्यांना काही मिळाले नाहीतरी ते युतीत तसेच पडून राहतील. अजितदादा, शिंदेंचे काम संपले संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना जे हवे आहे ते कधीच मिळणार नाही. भाजपचे यांच्याकडून महाराष्ट्र कमजोर करण्याचे काम करुण घेतले आहे. त्यांनी शिवसेना अन् राष्ट्रवादीसारखे पक्ष फोडले, आता यांचे काम संपले आहे. यापुढे जर हे दोन्ही पक्ष फुटले अन् भाजपला जाऊन मिळू शकतात असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. ..तरी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करु आम्हाला राज्याचे निकाल मान्य नसले तरी मुख्यमंत्री ठरला असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करु. निकालात गडबड घोटाळे आहे हे आम्ही सातत्याने दाखवून देत असलो तरी सत्तास्थापनेसाठी बहुमत लागत असते आणि ते कसेही आणले असले तरी आकडा महत्त्वाचा असतो, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. लोकशाहीसाठी आढावाचे आंदोलन संजय राऊत म्हणाले की, बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांना देशातील लोकशाहीचा बचावासाठी आंदोलन करावे लागते, यातच या निकालाचे रहस्य दडले आहे. समाज त्यांच्या मागे उभा राहील असे चित्र दिसत आहे.

  

Share