मस्ती आली का तुला…:संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी; उस्मानपुरा भागातील घटना, अंबादास दानवेंचा दावा

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात आमदार संजय शिरसाट यांनी उबाठाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. उस्मानपुरा भागातमतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. दरम्यान अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करताना दिसून येत आहेत. तर दोन मिनिटात गायब करुन टाकेल अशी धमकी देताना दिसून येत आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाकडून पैसे घेणारे मतदार देवळाई तांड्यावरून गायब 24 तासांपूर्वीच संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात 155 मतदार संख्या असलेल्या देवळाई तांडा येथे मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांच्या तीन गाड्या तांड्यावर गेल्या. त्यामुळे गावात दहशत पसरली होती. व्हिडिओमधील लोक तांड्यावरून निघून गेले होते. देवळाई तांडा येथे महायुतीच्या उमेदवाराचे पैसे वाटतानाचा व्हिडिओ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समोर आणला. या व्हिडिओमध्ये भाजपचे देवळाईचे माजी नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे पैसे देताना दिसत आहेत. ‘दिव्य मराठी’ने देवळाई तांड्याला भेट दिली. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची 3 वाहने गावात येऊन गेली होती. त्यामुळे याबाबत गावातील कुणीही बोलण्यास पुढे आले नाहीत. हा तर विरोधकांचा कट अंबादास दानवे काय म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. माझा विजय निश्चित असल्यामुळे कट रचण्याचे काम सुरू आहे. विरोधकांनी काहीही केले तरी मतदार जागरूक आहेत. संपूर्ण घटनेचा पोलिस तपास करतील. पैसे वाटप करण्याचा प्रकार मी केलेला नाही. – संजय शिरसाट, उमेदवार, शिंदेसेना हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत…

  

Share