शिक्षणातून देशाचा सुजाण- सुसंस्कृत नागरिक घडण्याची प्रक्रिया आवश्यक:दसनूरच्या उमेश्वर विद्यालयातील कार्यक्रमात पीएसआय बोचरे यांचे मत

सुरक्षा व कायदेविषयक माहिती देतांना निंभोरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हरिदास बोचरे यांनी शिक्षणातून देशाचा सुजाण अन‌् सुसंस्कृत नागरिक घडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आई-वडीलांची इभ्रत राखरे देखील आपली जबाबदारी आहे असेही त्यांची सांगितले. दसनूर (ता.रावेर) येथील उमेश्वर विद्यालयात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात गोपनीय विभागाचे प्रमुख अमोल वाघ, पोलिस पाटील दीपक चौधरी, सरपंच मयूर महाजन, मुख्याध्यापक एस जी महाजन,पर्यवेक्षक आर.एल. तायडे आदी उपस्थित होते. दरम्यान उपनिरीक्षक बोचरे यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना सुरक्षा, कायदा सायबर गुन्हे, समाज माध्यमांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. त्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.जी.महाजन यांनी तर सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले.

​सुरक्षा व कायदेविषयक माहिती देतांना निंभोरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हरिदास बोचरे यांनी शिक्षणातून देशाचा सुजाण अन‌् सुसंस्कृत नागरिक घडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आई-वडीलांची इभ्रत राखरे देखील आपली जबाबदारी आहे असेही त्यांची सांगितले. दसनूर (ता.रावेर) येथील उमेश्वर विद्यालयात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात गोपनीय विभागाचे प्रमुख अमोल वाघ, पोलिस पाटील दीपक चौधरी, सरपंच मयूर महाजन, मुख्याध्यापक एस जी महाजन,पर्यवेक्षक आर.एल. तायडे आदी उपस्थित होते. दरम्यान उपनिरीक्षक बोचरे यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना सुरक्षा, कायदा सायबर गुन्हे, समाज माध्यमांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. त्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.जी.महाजन यांनी तर सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले.  

Share