जनतेने आमच्या जास्त जागा निवडून दिल्या:म्हणून मोदींना संविधान बदलता आले नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

जनतेने आमच्या जास्त जागा निवडून दिल्या:म्हणून मोदींना संविधान बदलता आले नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. त्यावर भाजपला बहुमत मिळाले तर संविधान बदलतील, अशी शंका विरोधकांकडून उपस्थित करण्यात आली. तसेच भाजप संविधान बदलणार म्हणत विरोधकांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. जळगाव येथील प्रचार सभेत शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले 48 पैकी 31 जागा तुम्ही आम्हाला लोकसभेत निवडून दिल्या म्हणून मोदींचा संविधान बदलण्याचा डाव फासला, असे शरद पवार म्हणाले. सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत, हे तुमच्याशिवाय शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीवेळी 400 खासदार पाहिजेत असे म्हणत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळबेरं दिसत आहे. 400 पार जागा मिळत नाहीत तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती देखील त्यांच्याच लोकांनी सांगितली होती, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याचे यांच्या मनात पाप होते. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली. त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत इंडिया आघाडी तयार केली. सर्वांना एकत्र केले, वाटेल ते करू पण घटना बदल करू देणार नाही, असा निश्चय आम्ही केला, असे पवार म्हणाले. केंद्र सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले, चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांना सोबत घेत सरकार स्थापन केले. काय केले सरकार स्थापन करून? कोणते निर्णय घेतले? काय अवस्था आहे देशातल्या शेतकऱ्यांची, देशातील तरुणांची आणि भगिनींची काय अवस्था आहे. एका वर्षात 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्याच्या मालाला किंमत देत नाही, जो माल पिकवतो त्याला त्याच्या उत्पादनानुसार नाव मिळत नाही, अशी टीका पवारांनी केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment