काँग्रेसच्या माथ्यावरून आणीबाणीचे पाप कधीच धुतले जाणार नाही- मोदी:लोकसभेत पंतप्रधानांचे उत्तर; उद्या राज्यसभेत देणार

लोकसभेत ‘संविधानाच्या 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावरील दोनदिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. सुमारे १ तास ५० मिनिटे चाललेल्या भाषणात त्यांनी काँग्रेसचे वर्णन संविधानाची ‘शिकार’ करणारा पक्ष असे केले. ते म्हणाले, घटनादुरुस्तीचे असे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले आहे की ६ दशकांत ७५ वेळा संविधान बदलण्यात आले. गांधी-नेहरू कुटुंबावर टीका करताना ते म्हणाले, ७५ वर्षांच्या प्रवासात एका कुटुंबाने ५५ वर्षे राज्य केले. या घराण्यातील वाईट विचार, वाईट कृत्ये आणि कुकर्मांची परंपरा सुरू आहे. जेव्हा देश संविधानाची २५ वर्षे साजरी करत होता, तेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली होती. देशाचे तुरुंगात रूपांतर झाले, नागरिकांचे हक्क हिरावले गेले. काँग्रेसच्या कपाळावरील हे पाप कधीच धुतले जाणार नाही. जेव्हा जेव्हा जगात ‘लोकशाही’ची चर्चा होईल, तेव्हा जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, या परिवाराने ‘रक्ताची चव चाखत’ संविधानाला वारंवार घायाळ केले. ‘पूर्वी पंडित नेहरूंचे स्वतःचे संविधान चालायचे. नेहरूंनी पेरलेल्या बीजाला इंदिरा गांधींनी खतपाणी घातले. १९७१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय राज्यघटना बदलून रद्द करण्यात आला. या कुटुंबाने प्रत्येक स्तरावर राज्यघटनेला आव्हान दिले. न्यायालयाचे पंख छाटले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले – गांधी कुटुंबाची पुढची पिढीही हाच खेळ खेळत आहे. देशाच्या एकता आणि अखंडतेच्या हितासाठी राज्यघटनेच्या निर्मात्यांनी धर्म आणि श्रद्धेच्या आधारावर आरक्षण न देण्याचा निर्णय घेतला होता, पण सत्तेच्या लालसेपोटी आणि व्होटबँकेच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेस हे पाऊल उचलत आहे. घटनात्मक भावनेचे उल्लंघन करून काँग्रेस तुष्टीकरणाला पुढे नेत आहे. संविधान सभेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी पुरुषोत्तम दास टंडन आणि भीमराव आंबेडकर यांसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या विधानांचा हवाला देत मोदी म्हणाले की, – संविधान निर्माण करणाऱ्यांना हे चांगले ठाऊक होते की भारताचा जन्म १९४७ मध्ये झाला नव्हता किंवा १९५० मध्ये लोकतांत्रिक झाला नव्हता. हजारो वर्षांच्या परंपरेचा हा परिणाम होता. राज्यघटनेने महिलांना मतदानाचा अधिकार दिला आहे आणि देश आता महिलांच्या नेतृत्वाखाली विकास पाहत आहे. काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, ज्यांनी संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला आरक्षणाबाबतच्या विधेयकाची प्रत फाडून महिला आरक्षणाला ४० वर्षे मागे ढकलले, तेच आज त्यांचे मार्गदर्शक झाले आहेत. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देणारा कायदा एकमताने मंजूर केल्याबद्दल त्यांनी खासदारांचे कौतुक केले.
ही लढाई संविधान आणि मनुस्मृतीमध्ये आहे … राहुल यांनी संविधान व मनुस्मृतीची प्रत दाखवत म्हटले की, मनुस्मृती ‘तुमचे पुस्तक’ आहे. भाजप, आरएसएस मनुस्मृती समर्थक आहेत. पण देश संविधानावर चालेल. मनुस्मृतीवर नाही. भारत लोकशाहीची जननी, २०४७ पर्यंत विकसित होऊ भारताला लोकशाहीची जननी असे संबोधत मोदी म्हणाले की, देशाने २०४७ पर्यंत विकसित होण्याचा संकल्प केला आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी एकतेची खूप गरज आहे. आमचे संविधान आमच्या एकतेचा आधार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनापासून ते सावरकर आणि एकलव्यापर्यंतची कहाणी ऐकवत संघ आणि भाजपवर हल्ला केला. ते म्हणाले की, ‘जेव्हा तुम्ही राज्यघटना वाचवण्याचे बोलता तेव्हा तुम्ही ज्यांची पूजा करता, ते ‘सर्वोच्च नेते’ सावरकरांचा अपमान करता. सावरकर म्हणाले होते की, संविधानात भारतीय असे काहीही नाही. त्यांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला महत्त्व दिले होते. देशातील तरुण एकलव्याप्रमाणे परीक्षेची तयारी करतात, मात्र सरकारने ‘अग्निवीर’ आणून त्यांचा अंगठा कापला. पेपरफुटीने त्यांचा अंगठा कापला जातो. ते शेतकऱ्यांवर अश्रुधूर, लाठ्यांचा वापर करून त्यांचे अंगठे कापत आहात. धारावी, बंदर, विमानतळ एका उद्योगपतीला देऊन देशाचा अंगठा कापला जात आहे. संभलचा संदर्भ देत राहुल म्हणाले की, एका धर्माला दुसऱ्या धर्माशी लढवा, असे घटनेत कुठे लिहिले आहे. हाथरसचा संदर्भ देत राहुल म्हणाले, दुष्कर्म करणाऱ्यांनी बाहेर राहावे, असे संविधानात कुठे लिहिले आहे. यूपीमध्ये संविधान नव्हे तर मनुस्मृतीची अंमलबजावणी सुरू आहे. जर सरकारने हाथरसच्या पीडित कुटुंबाचे इतरत्र पुनर्वसन केले नाही तर आम्ही करू. एकलव्याप्रमाणे युवकांचा अंगठा कापला जात आहे : राहुल गांधी केंद्र सरकार सोमवारी लोकसभेत वन नेशन-वन इलेक्शनशी संबंधित २ बिल सादर करेल. ती संयुक्त स​ंसदीय समितीला पाठवली जाऊ शकतात. राज्यसभेत सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संविधानावरील चर्चा सुरू करतील. विरोधकांकडून काँग्रेसचे अध्यक्ष खरगे बोलतील.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment