आज बाळासाहेब ठाकरे असते तर लाथच मारली असती:एआय भाषणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक येथील मेळाव्यात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण एआयच्या माध्यमातून दाखवण्यात आले. या भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा उबाठाने केला, असे बावनकुळे म्हणाले. बाळासाहेबांचा आवाज वापरुन त्यांच्या विचारांचा द्रोह केला आहे. आज वंदनीय बाळासाहेब असते तर लाथच मारली असती, असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. धिक्कार असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली. आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो, असेही बावनकुळे म्हणाले. नेमके काय म्हणाले बावनकुळे? मला खात्री आहे, आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरविले, ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली, वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले, वक्फच्या विरोधात मतदान केले, राममंदिराला सातत्याने विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, 370 रद्द करणाऱ्याला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा दिला, वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली, डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले, कोविड काळात खिचडीत घोटाळे केले, मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले, त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती, असे बावनकुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. बाळासाहेबांच्या आवाजाचा असा गैरवापर करु नका ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडवलेत. किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करु नका, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. हा बाळासाहेबांचा अपमान आहे – नरेश म्हस्के दरम्यान, शिवसेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या एआय भाषणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा उपयोग करावा लागला याचे वाईट वाटत आहे. पण बाळासाहेबांचा खरे विचार आमच्यासोबत आहे. त्यांना बनावट कॅसेटचा उपयोग करावा लागला आहे. बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल करून आमच्यावर टीका करत आहेत. बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल, असे नरेश म्हस्के म्हणाले. त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नाही. त्यांना सर्वच सोडून चालले आहेत. म्हणून बाळासाहेबांच्या आवाजात बोलायला लावून बनावटगिरी करत आहेत. हा बाळासाहेबांचा अपमान आहे, असा घणाघात नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर केला. हे ही वाचा… गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी पाप धुतले जात नाही:इतिहासात तुमची नोंद गद्दार म्हणूनच राहणार, बाळासाहेब ठाकरेंचे एआय भाषण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नाशिकमध्ये आज निर्धार मेळावा पार पडत आहे. या निर्धार मेळाव्यात एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाळासाहेबांचे ऐतिहासिक भाषण पुन्हा ऐकायला मिळाले. “गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी पाप धुतले जात नाही. इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार.” अश शब्दांत बाळासाहेब ठाकरे यांनी गद्दारांवर जोरदार टीका केली. पूर्ण बातमी वाचा… राज्यपाल भवनाच्या जागेवर शिवस्मारक बांधा:राज्यपालांना मंत्र्यांच्या बंगल्यात हलवा, उद्धव ठाकरेंनी केले उदयराजेंच्या मागणीचे समर्थन उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिक येथील निर्धार शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवत सर्वसामान्य शिवसैनिकांना अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले. सध्या उन्हाळा खूपच तापलाय… महाराष्ट्र खूप गरम झालाय. पण हा सूर्य आग ओकत असताना आपली डोकी उन्हाने नव्हे, तर अन्यायाविरोधात लढण्यासाठी पेटले पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी मुंबईतील राज्यपाल भवनाच्या जागेवर छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचीही मागणी केली. या प्रकरणी त्यांनी भाजप खासदार उदयराजे भोसले यांच्या मागणीचे समर्थन केले. पूर्ण बातमी वाचा…