परिवहन विभाग ‘हाय अलर्ट’वर:बसेसमध्ये CCTV, AI चा वापर, GPS यंत्रणा तर IPS अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी- सरनाईक

स्वारगेट बस डेपो परिसरात एसटी बस मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर आता महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग हाय अलर्ट वर आला आहे. या संदर्भात आज झालेल्या बैठकीत सर्व एसटी डेपोंमध्ये सीसीटीव्हीचे जाळे बसवण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या आहेत. तसेच सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एसटीच्या सुरक्षेसाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर, बसेस मध्ये जीपीएस यंत्रणा देखील अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महामंडळावर आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी आपण करणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. पुणे येथील स्वारगेट बस डेपो परिसरात बस मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्य सरकारचा परिवहन विभाग हाय अलर्ट मोडवर आला आहे. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीमध्ये एसटी महामंडळातील महिलांच्या आणि एकंदरीत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अनेक उपाययोजना करण्यावर चर्चा झाली आहे. या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यामध्ये एसटी महामंडळाच्या सर्वच बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, एसटी बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणे तसेच सर्व बसला जीपीएस डिव्हाइस अनिवार्य करणे, यासह एस टी महामंडळामध्ये सुरक्षेसाठी एका आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी आपण करणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….