टीआरएफने 2019 नंतर काश्मिरात सर्वाधिक टार्गेट हत्या त्यांनी केल्या:‘कलमा वाचायला जमला नाही म्हणून गाेळी घातली’

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून देशभरात संताप आहे. हल्ला झाला तेव्हा संताेष जगदाळे (५४) यांचे कुटुंब टेंटमध्ये दडून बसले. मुलगी आशवरी (२६) नंतर सांगितले की आम्ही ५ जण पहलगामला आलाे हाेताे. दहशतवाद्यांनी टेंटजवळ येऊन पप्पांना (संताेष) बाहेर बाेलावले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदींचे समर्थन करत असल्याचा आराेप केला आणि कलमा वाचायला सांगितला. त्यांनी ते जमले नाही म्हणून ३ गाेळ्या मारल्या. माझ्या काकांनाही गाेळी मारली. हल्लेखाेरांनी तेथील अनेक पुरुषांना गाेळी मारली. तेव्हा तेथे मदतीसाठी काेणीही नव्हते. ना पाेलिस, ना लष्करी जवान. ते सगळे २० मिनिटांनंतर आले. महाराष्ट्रातील नागपूरचे पर्यटक तिलक रुपचंदानी म्हणाले, घाेडा बुक केला हाेता. गाईडने सात पर्यटनस्थळे फिरवून आणले. बैसरन खाेऱ्याच्या २० फूट आधीच गाेळीबार सुरू केला. आम्ही धडपडत जंगलाच्या दिशेने पळालाे. तिलक यांच्या पत्नीने जीव वाचवण्याच्या प्रयत्नात डाेंगरावरून उडी मारल्याने त्यांना दाेन्ही पायांना फ्रॅक्चर झाले. त्यांनी सांगितले की, गाेळ्यांचा आवाज उशिरापर्यंत ऐकू येत हाेता. मागे वळण्याची हिंमत कुणातही नव्हती. जवळील व्यक्तीला शाेधण्यासाठी वेळ नव्हता. सगळे पळत हाेते.ईश्वराचे नाव घेत हाेते. दाेन मिनिटही थांबलाे असताे तर कुणीही वाचू शकले नसते. बैसरन, पहलगामचे रिसाॅर्ट शहरापासून सहा किमीवर आहे. येथे घनदाट देवदार जंगले आणि डाेंगरान वेढलेले मैदान आहे. ही पर्यटक व ट्रेकर्सची पसंतीची जागा आहे. त्यास मिनी स्वित्झर्लंडही म्हटले जाते.
अमेरिका; फ्लोरिडाहून कुटुंबासमवेत सुट्यांसाठी आलेल्या वितानची हत्या पश्चिम बंगालच्या विष्णुपूरच्या वैष्णवघाटाचे रहिवासी वितान अधिकारीही पहलगाम हल्ल्यात ठार झाले. अमेरिकेच्या फ्लोरिडात राहणारे वितान नुकतेच कुटुंबासमवेत सुट्यांमध्ये काश्मीरला आले होते. वितान यांची पत्नी सोहिनी आणि मुले सुरक्षित आहेत. टीआरएफची स्थापना कधी झाली? टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाची एक आघाडीची संघटना आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर २०१९ मध्ये ते तयार केले. सुरुवातीला ते ऑनलाइन युनिट म्हणून काम करत होते, परंतु लवकरच ग्राउंड ग्रुपमध्ये रूपांतरित झाले. भारतात दहशतवादी कृत्य करणे हा उद्देश होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये टीआरएफ हा मोठा दहशतवादी धोका आहे. भारत सरकारने २०२३ मध्ये टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केले. टीआरएफची स्थापना का केली आणि त्याचे नेतृत्व कोण करत आहे? ટીटीआरएफची निर्मिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने लष्कर-ए-तैयबाच्या मदतीने केली होती. पाकिस्तानला एफएटीए ग्रे लिस्टमधून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव कमी करणे हा यामागील उद्देश होता. टीआरएफचे संस्थापक शेख सज्जाद गुल आहेत, ज्यांच्यावर पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येचा आरोप आहे. त्याचे इतर सक्रिय दहशतवादी साजिद जट्ट आणि सलीम रहमानी दोघेही लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहेत. टीआरएफने कोणकोणते हल्ले केले? टीआरएफने आतापर्यंत केलेले टार्गेट किलिंग. एप्रिल २०२०: केरन सेक्टरमध्ये हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होेते. ३० ऑक्टोबर २०२०છ: कुलगाममध्ये भाजप कार्यकर्त्यांची हत्या. २६ नोव्हेंबर २०२०: श्रीनगरमध्ये २ राष्ट्रीय रायफल्स ऑफ आर्मीवर हल्ला. २६ फेब्रुवारी २०२३: पुलवामामध्ये काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची हत्या २० ऑक्टोबर २०२४: गंदरबलमध्ये दहशतवादी हल्ला. यामध्ये एक डॉक्टर आणि ६ प्रवासी कामगारांचा मृत्यू झाला. टीआरएफ कसे काम करते? टीआरएफ काश्मिरी पंडित, हिंदू, शीख, कर्मचारी आणि प्रवासी मजुरांना लक्ष्य करून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा कट रचत आहे. टीआरएफमध्ये कोणतेही आत्मघातकी बॉम्बर नाहीत. टीआरएफने तरुणांचा एक नवीन गट तयार केला आहे जो सुरक्षा दलांच्या रडारवर नाही, ज्यामुळे त्यांना शोधणे कठीण झाले आहे. कार्यकर्त्यांचे फार कमी फोटो उपलब्ध आहेत आणि ते जमिनी नेटवर्कद्वारे सोपे लक्ष्य निवडतात. तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी सोशल मीडियावर मानसिक ऑपरेशन्स चालवतात.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने खूप दु:ख झालाे. निर्दाेष नागरिकांवर हा नृशंस हल्ला भ्याड व खूप निंदनीय आहे.
-राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री हा हल्ला अलीकडील नागरिकांवरील सर्वात माेठा हल्ला आहे. -उमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री , जम्मू कश्मीर. हल्ला निंदनीय आहे. दहशतवादविरुद्ध देश एकजूट आहे. सरकारने जम्मू-काश्मीरमधील स्थिती सामान्य असल्याचा दावा करण्याएेवजी जबाबदारी घेत ठाेस पावले उचलावीत. – राहुल गांधी, विराेधी नेता, लोकसभा. हा हल्ला देशाची एकता व अखंडत्वावर प्रहार आहे. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून निंदा करावी. सरकार हल्ल्यास जबाबदार लाेकांना तत्काळ दंड करावा. -दत्तात्रेय होसबळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. क्रूर गुन्हा आहे. हा गुन्हा करणारे आणि त्यास याेग्य ती शिक्षा मिळेल, अशी आशा वाटते. मी दहशतवादाविरुद्ध लढाईत सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. -व्लादिमीर पुतीन, राष्ट्रपती रशिया. भारतातील दहशतवादी हल्ल्याने खूप दु:खी झालाे. त्यात अनेक लाेकांचा मृत्यू झाला. इटली पीडित कुटुंबे, सरकार व भारतीयांसाेबत आहे. – जॉर्जिया मेलोनी, पंतप्रधान, इटली.