नंदुरबारमध्ये भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला:100 हून अधिक मेंढ्या ठार, रस्त्यावर पडला मृतदेहांचा खच

नंदुरबारमध्ये भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला:100 हून अधिक मेंढ्या ठार, रस्त्यावर पडला मृतदेहांचा खच

नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडले आहे. यात सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. महामार्गावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मेंढ्यांना चिरडल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धुळ्याहून सुरतच्या दिशेने जाणारी क्रमांक ए.पी. 31 पी.जी 0869 या वाहनाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100 हून अधिक मेंढ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मार्गावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. तर या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघात झाल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळताच पोलिस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे. नेमके काय घडले? मेंढीचे मालक लखा गोविंदा गोईकर बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर रा.विजापूर ता.साक्री जि.धुळे हे 700 मेंढ्याचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जात असताना मागून येणाऱ्या आंध्रप्रदेश राज्यातील गुजरातकडे जात असताना ट्रक चालक रमेश दुगंला राजू या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने मेंढ्यांना चिरडले या कळपामध्ये काही मेंढ्या या गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. नुकसान भरपाई मिळावी ट्रक चालकाच्या निष्काळजी पणामुळे मेंढ्या चिरडल्या गेल्याचा आरोप करत मेंढपाळाने आरोपी ट्रक चालकावर कठोर कारवाई करत नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. या अपघातानंतर महामार्गावर तब्बल 100 ते 150 मीटरपर्यंत मेंढ्यांचे मृतदेह पडले होते…

​नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडले आहे. यात सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. महामार्गावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मेंढ्यांना चिरडल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धुळ्याहून सुरतच्या दिशेने जाणारी क्रमांक ए.पी. 31 पी.जी 0869 या वाहनाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100 हून अधिक मेंढ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मार्गावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. तर या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघात झाल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळताच पोलिस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे. नेमके काय घडले? मेंढीचे मालक लखा गोविंदा गोईकर बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर रा.विजापूर ता.साक्री जि.धुळे हे 700 मेंढ्याचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जात असताना मागून येणाऱ्या आंध्रप्रदेश राज्यातील गुजरातकडे जात असताना ट्रक चालक रमेश दुगंला राजू या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने मेंढ्यांना चिरडले या कळपामध्ये काही मेंढ्या या गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. नुकसान भरपाई मिळावी ट्रक चालकाच्या निष्काळजी पणामुळे मेंढ्या चिरडल्या गेल्याचा आरोप करत मेंढपाळाने आरोपी ट्रक चालकावर कठोर कारवाई करत नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. या अपघातानंतर महामार्गावर तब्बल 100 ते 150 मीटरपर्यंत मेंढ्यांचे मृतदेह पडले होते…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment