पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर गुन्हा दाखल करू:अक्षय शिंदेच्या वकिलांचा इशारा, न्यायालयाने 5 अधिकाऱ्यांना ठरवले दोषी
बदलापूर येथील एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती. त्यानंतर त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. मात्र हा एन्काऊंटर बनावट असल्याचे न्यायालयीन चौकशी समितीने मुंबई उच्च न्यायालयात म्हंटले आहे. तसेच न्यायालयाने 5 पोलिस अधिकाऱ्यांना दोषी देखील ठरवले आहे. या प्रकरणावर आता अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे म्हणाले, मर्डर केसचा पहिला टप्पा आम्ही जिंकलो आहोत. आमची मदत केल्याबद्दल उच्च न्यायालय आणि न्यायदंडाधिकारी यांचे धन्यवाद करतो. ठाण्याचे न्यायदंडाधिकारी यांनी काय आपल्या अहवालात सांगितले आहे ते सांगतो. अक्षय शिंदेने अधिकाऱ्यांवर फायरींग केले हे सांगितले. मात्र गनशॉट रेसिड्यू दिसले नाही. पिस्टलवर देखील त्याचे ठसे नाहीत. बॉटलने पाणी प्यायला त्यावर देखील त्याचे ठसे नाहीत. मांडीत गोळी मारली अधिकाऱ्यांच्या यासंदर्भात जिन्सवर देखील रेसिड्यू नाहीत. पुढे बोलताना अमित कटारनवरे म्हणाले, माध्यमांसमोर वेगळे सांगितले आणि अधिकारी कोर्टासमोर वेगळे बोलले. अक्षयच्या गुडघ्यांवर देखील जखमा आहेत. सीन रिक्रिएशनमध्ये निर्दशनास येत आहे की 4 अधिकारी यासंदर्भात इनफ होते. हा खून आहे, या संदर्भात अहवाल देखील दुजोरा देतोय. अक्षयचे आई वडील हे जे बोललेत ते सत्य आहेत. अक्षय शिंदेंच्या मृत्यूस 5 पोलिस कारणीभूत आहेत, असे ठाण्याच्या न्यायदंडाधिकारी यांनी अहवालात सांगितले आहे, अशी माहिती अमित कटारनवरे यांनी दिली आहे. तसेच पुढे बोलताना अमित कटारनवरे यांनी इशारा देखील दिला आहे. ते म्हणाले, या प्रकरणी यांच्यावर आता एफआयआर दाखल होईल. 5 अधिकाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते दाखल करतील किंवा नाही, आम्ही मुंब्रा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करा म्हणून तिथे जाऊन विनंती करु. आरोपी पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.