पोलिसांची कबुली, घटनेनंतर 12 तासांनी संकेत बावनकुळेला ताब्यात घेण्यात आले:उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी पोलिसांवर केली प्रश्नांची सरबत्ती

पोलिसांची कबुली, घटनेनंतर 12 तासांनी संकेत बावनकुळेला ताब्यात घेण्यात आले:उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी पोलिसांवर केली प्रश्नांची सरबत्ती

नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेतला घटना घडून गेल्यावर १२ तासांनी ताब्यात घेतले, अशी कबुली वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. शिंदेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बर्डी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकारे, पोलीस उपायुक्त राहूल मदने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यातील एका उत्तरात त्यांनी ही कबुली दिली. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाप्रमाणेच यातही संकेतला निबंध लिहायला लावून सोडून देणार का, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा संकेतवर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा कायदेशीर लढाई लढावी लागेल, असा इशारा अंधारे यांनी नागपूर पोलिसांना दिला. तत्पूर्वी त्यांनी ऑडी अपघाताचा घटनाक्रम समजावून घेतला. त्या नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिस प्रकरण दडपत असल्याचा आरोप केला. अंधारे म्हणाल्या की, प्रारंभी संकेत गाडीत नव्हते असे भासवण्यात आले. नंतर ते गाडीत असल्याचे सांगण्यात अाले. भाजप नेते रावसाहेब दानवेंनी संकेत बावनकुळे गाडीत मागे बसलेला होता असे सांगितले. तर पोलिसांनी तो ड्रायव्हरच्या बाजूला बसल्याचे सांगितले. नागपुरात ३५०० सीसीटिव्ही आहे. गाडीने प्रवास केला त्या ठिकाणचे फुटेज तपासले का, अशा प्रश्नांची सरबत्ती अंधारेंनी पोलिसांवर केली. संकेत बावनकुळेंचे मेडिकल का नाही केले, यावर पोलिसांनी घटनेनंतर संकेत तिथून पळून गेला होता असे सांगितले. अंधारेंच्या सवालांच्या फैरीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची गोलमोल उत्तरे Q अंधारे : ती ऑडी संकेतच्या नावावर आहे, ही माहिती स्पॉट पंचनाम्यात मिळाली?
A हो केला.
Q : ही गाडी आपण गॅरेजला रिपेअरसाठी पाठवलीत?
A : नाही.
Q : मी व्हिडिओ फूटेज ट्विट केलंय
A : आम्ही गाडी हस्तगत केली, दुसऱ्या दिवशी टो करून पाठवली, पीआय दर्जाचा अधिकारी पाठवला आणि पोलीस स्टेशनला घेऊन आलो, ज्या अवस्थेत अपघात झाला, त्या अवस्थेत ती पोलिस स्टेशनला लागली आहे.
Q : माझा मुलगा गाडीत नव्हता.. असं चंद्रशेखर बावनकुळेंचें वक्तव्य आहे?
A : (मौन.)
Q : आधी संकेत मागच्या सीटवर, मग बाजूच्या सीटवर. नागपुरात ३५०० सीसीटीव्ही आहेत. तरीही असं का सांगता?
A : जिथून त्यांचा प्रवास सुरु झाला त्या लाहोरी बारला मी स्वतः गेलो होतो. डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. फुटेज जप्त केलं.
Q : आपण मेडिकल किती लोकांचं केलं?
A : दोन जणांचं…
Q संकेतचं का नाही केलं?
A : घटनेनंतर १२ तासांनी ताब्यात घेतलं. तेव्हा मेडिकल केल्यास उपयोग होत नाही
Q : संकेत पळून कसा गेला?
A : काय झालं, जसा इथून तो निघाला. डॅश लागला. नंतर गाडी बंद पडली. दोन जण थांबले. पोलो कारवाल्यांना डॅश लागली. त्यांनी पाठलाग केला, यावेळी तो पळाला., हे दोघे ऑन द स्पॉट मिळाले. अपघातग्रस्त कार सव्वा कोटीची ‘हिट अँड रन’ प्रकरणातील संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर असलेली कार ऑडी कंपनीचे ई- ट्रोन मॉडेल आहे. ही अलिशान इलेक्ट्रीक कार आहे. त्याची किमत सुमारे एक कोटी ते एक कोटी २० लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते.

​नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेतला घटना घडून गेल्यावर १२ तासांनी ताब्यात घेतले, अशी कबुली वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. शिंदेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बर्डी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकारे, पोलीस उपायुक्त राहूल मदने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यातील एका उत्तरात त्यांनी ही कबुली दिली. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाप्रमाणेच यातही संकेतला निबंध लिहायला लावून सोडून देणार का, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा संकेतवर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा कायदेशीर लढाई लढावी लागेल, असा इशारा अंधारे यांनी नागपूर पोलिसांना दिला. तत्पूर्वी त्यांनी ऑडी अपघाताचा घटनाक्रम समजावून घेतला. त्या नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिस प्रकरण दडपत असल्याचा आरोप केला. अंधारे म्हणाल्या की, प्रारंभी संकेत गाडीत नव्हते असे भासवण्यात आले. नंतर ते गाडीत असल्याचे सांगण्यात अाले. भाजप नेते रावसाहेब दानवेंनी संकेत बावनकुळे गाडीत मागे बसलेला होता असे सांगितले. तर पोलिसांनी तो ड्रायव्हरच्या बाजूला बसल्याचे सांगितले. नागपुरात ३५०० सीसीटिव्ही आहे. गाडीने प्रवास केला त्या ठिकाणचे फुटेज तपासले का, अशा प्रश्नांची सरबत्ती अंधारेंनी पोलिसांवर केली. संकेत बावनकुळेंचे मेडिकल का नाही केले, यावर पोलिसांनी घटनेनंतर संकेत तिथून पळून गेला होता असे सांगितले. अंधारेंच्या सवालांच्या फैरीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची गोलमोल उत्तरे Q अंधारे : ती ऑडी संकेतच्या नावावर आहे, ही माहिती स्पॉट पंचनाम्यात मिळाली?
A हो केला.
Q : ही गाडी आपण गॅरेजला रिपेअरसाठी पाठवलीत?
A : नाही.
Q : मी व्हिडिओ फूटेज ट्विट केलंय
A : आम्ही गाडी हस्तगत केली, दुसऱ्या दिवशी टो करून पाठवली, पीआय दर्जाचा अधिकारी पाठवला आणि पोलीस स्टेशनला घेऊन आलो, ज्या अवस्थेत अपघात झाला, त्या अवस्थेत ती पोलिस स्टेशनला लागली आहे.
Q : माझा मुलगा गाडीत नव्हता.. असं चंद्रशेखर बावनकुळेंचें वक्तव्य आहे?
A : (मौन.)
Q : आधी संकेत मागच्या सीटवर, मग बाजूच्या सीटवर. नागपुरात ३५०० सीसीटीव्ही आहेत. तरीही असं का सांगता?
A : जिथून त्यांचा प्रवास सुरु झाला त्या लाहोरी बारला मी स्वतः गेलो होतो. डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. फुटेज जप्त केलं.
Q : आपण मेडिकल किती लोकांचं केलं?
A : दोन जणांचं…
Q संकेतचं का नाही केलं?
A : घटनेनंतर १२ तासांनी ताब्यात घेतलं. तेव्हा मेडिकल केल्यास उपयोग होत नाही
Q : संकेत पळून कसा गेला?
A : काय झालं, जसा इथून तो निघाला. डॅश लागला. नंतर गाडी बंद पडली. दोन जण थांबले. पोलो कारवाल्यांना डॅश लागली. त्यांनी पाठलाग केला, यावेळी तो पळाला., हे दोघे ऑन द स्पॉट मिळाले. अपघातग्रस्त कार सव्वा कोटीची ‘हिट अँड रन’ प्रकरणातील संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर असलेली कार ऑडी कंपनीचे ई- ट्रोन मॉडेल आहे. ही अलिशान इलेक्ट्रीक कार आहे. त्याची किमत सुमारे एक कोटी ते एक कोटी २० लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment