उद्धव ठाकरे ‘आधुनिक औरंगजेब’:त्यांनी भावांना आणि शेवटच्या काळात वडिलांनाही त्रास दिला; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

उद्धव ठाकरे ‘आधुनिक औरंगजेब’:त्यांनी भावांना आणि शेवटच्या काळात वडिलांनाही त्रास दिला; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब प्रमाणे आपल्या भावांना आणि अखेरच्या काळात आपल्या वडिलांना देखील त्रास दिला. त्यामुळे ते आधुनिक काळातील औरंगजेब असल्याची बोचरी टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. या संदर्भात एका वृत्त संस्थेची बोलताना नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना, शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, “ते नवीन युगाचे ‘आधुनिक औरंगजेब’ आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावांना औरंगजेब सारखेच त्रास दिला. राज ठाकरेंनी स्वतः म्हटले होते की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या शेवटच्या काळात त्रास दिला… ते त्यांच्या वडिलांच्या विचारसरणीचे पालन करत नव्हते. म्हणूनच उद्धव ठाकरे हे ‘आधुनिक औरंगजेब’ आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व विचारसरणीचे शत्रू असलेल्यांशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप देखील नरेश म्हस्के यांनी केला आहे. राज ठाकरेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना घेरले नरेश म्हस्के यांनी दावा केला की, “राज ठाकरे हे अनेकवेळा बोलले आहेत की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या शेवटच्या काळात खूप त्रास दिला. औरंगजेबाने सत्तेसाठी त्यांच्या भावांना संपवले. उद्धव ठाकरेंनी वेगळे काय केले? त्यांनी पद्धतशीरपणे स्वतःच्या भावांना संपवले. ‘उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शत्रूंशी हातमिळवणी केली’ उद्धव ठाकरेंवर आरोप करताना नरेश म्हस्के म्हणाले की, “बाळासाहेबांची वैचारिक संपत्ती त्यांनी सोडली, मात्र उर्वरित संपत्तीवर भावाकडे दावा ठोकला.” हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या शेवटच्या काळात त्रास दिला. बाळासाहेब ठाकरेंचे काँग्रेसच्या विचारांशी वैर होते, उद्धव ठाकरेंनी त्या शत्रूंशी हातमिळवणी केली. त्यांच्या मृत्यूनंतरही ते शत्रूंशी हातमिळवणी करून शिवसेनेला दुखावत आहेत, त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना आधुनिक युगाचा औरंगजेब म्हणेन, असे देखील म्हस्के यांनी म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment