उद्धव ठाकरे यांचा मित्रपक्ष काँग्रेसला सल्ला:म्हणाले – आता सावरकरांच्या नावाने बोलणे बंद करावे, नाना पटोलेंनी मात्र बोलणे टाळले

उद्धव ठाकरे यांचा मित्रपक्ष काँग्रेसला सल्ला:म्हणाले – आता सावरकरांच्या नावाने बोलणे बंद करावे, नाना पटोलेंनी मात्र बोलणे टाळले

आता सावरकरांच्या नावाने बोलणे बंद करावे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेहरूंच्या नावाने रडगाणे बंद करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मात्र, उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सल्ल्यावर बोलणे टाळले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलेल्या सल्ल्यावर मी काही बोलणार नसल्याचे पटोले म्हणाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरातील हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली. त्यांनी विधानपरिषद सभागृहात उपस्थिती दर्शवली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मित्रपक्ष काँग्रेस आणि भाजपला उपरोक्त सल्ला दिला. आताचा काळ आपल्याकडे बघतोय
मोदींनी नेहरूंचे रडगाणे बंद करावे, तर काँग्रेसने सावकरांवर बोलणे सोडावे, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू आपापल्या जागी आहेत. त्यांनी त्यांच्या काळात जे करायचे हेाते ते करून गेले. आताचा काळ आपल्याकडे बघत आहे. आता आपण काय करणार आहोत हे लोकांना दाखवले पाहिजे, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांवरून भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने सावरकरांना भारतरत्न का जाहीर केला नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस यांना अनेक वेळा पत्र दिले, मग अजून मान्यता का मिळाली नाही? असेही ते म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलणे टाळले
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलेल्या सल्ल्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता सध्या वर्तमानच धोक्यात असल्यामुळे आम्हाला भूतकाळातील घटनांवर बोलायचे नाही. आमच्यासाठी सध्या परभणी, बीड, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंनी जो सल्ला दिला, त्यावर मी काही वक्तव्य करणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा सल्ला मित्र पक्ष काँग्रेस ऐकणार का? हे पहावे लागणार आहे. हे ही वाचा… छगन भुजबळ अधून – मधून माझ्या संपर्कात:उद्धव ठाकरे यांचे विधान; नाराज लोकांना आता आमची भूमिका योग्य वाटत असल्याचा दावा छगन भुजबळांनी अजून संपर्क केला नसला तरी छगन भुजबळ अधून-मधून माझ्या संपर्कात असतात, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर नाराज लोकांना आता आमची भूमिका योग्य वाटत आहे, असेही त्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सविस्तर वाचा… राज्यपालांनी शपथविधीची अधिसूचनाच काढली नाही:ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांचा दावा; विधानसभेत सत्ताधारी – विरोधकांत जुंपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत राज्यपालांनी विद्यमान महायुती सरकारच्या शपथविधीची अधिसूचनाच काढली नसल्याचा धक्कादायक दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर जोरदार पलटवार करत ते वैफल्यग्रस्त झाल्याचा आरोप केला. यामुळे सभागृहाचे कामकाज चांगलेच तापले होते. दरम्यान, राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात 60 वेळा माझे सकार असा उल्लेख केला. हे तुमचे सरकार कसे झाले? याचा विचार करा, असेही जाधव यावेळी म्हणाले. सविस्तर वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment