नालायक महाडिक महिलांना नोकर समजतो का?:सोलापूर दक्षिणमधून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नालायक महाडिक महिलांना नोकर समजतो का?:सोलापूर दक्षिणमधून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप खासदार मुन्ना महाडिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दीड हजार रुपये तुम्हाला देतात. काल पर्वा त्यांचा नालायक पाहिला का? त्याला मुन्ना महाडिक म्हणतात. तो मुन्ना महाडिक म्हणाला, ज्यांना आम्ही पैसे दिलेत, त्या महिला आम्ही महाविकास आघाडीच्या सभेत गेल्या तर फोटो काढून ठेवा. तुम्ही महिलांना नोकर समजताय का? असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दक्षिण सोलापूर येथील ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, नवीन गुलाबी जॅकेट तुम्ही सोबत घेतले त्यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. ते माझ्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पण त्यांना भाजपने तुरुंगात टाकले. फडणवीस यांनी दाऊदशी त्यांचे संबंध जोडले आणि ठोस पुरावे आहेत म्हणाले, मग आता ते पुरावे कुठे ठोसले? तुम्ही मुंबईत येणार तेव्हा नवाब मलिक यांना व्यासपीठावर घेणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवारांना विचारतो की जे तुमच्या उमेदवाराला नाकारतात त्यांच्या सोबत युतीमध्ये राहता? असेही उद्धव ठाकरे म्हणाले. या प्रचार सभेत कॉंग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे उपस्थित नव्हत्या. उद्धव ठाकरे त्यांना उद्देशून म्हणाले, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सांगतोय की तुम्ही सोबत आहात. सोलापूर आणि माढा दोन्ही ठिकाणी खासदार आणले आहेत. प्रणिती शिंदे इथे नाहीत. तिलाही सांगणे आहे, तू प्रचारात उतरले पाहिजे. मी माझ्या सभा सोडून इथे आलो होतो, तुझ्यासाठी मी आलो होतो. तू आता त्यांच्यासाठी मेहनत घे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, दाढीवाला दाढी खाजवला तरी पैसे पडतात. या पन्नास खोक्यांचा सूड तुम्हाला उगवावे लागेल. गद्दारांना पन्नास कोटी आणि महिलांना फक्त पंधराशे रुपये देतात. मी अमर पाटीलसाठी आलो पण महाविकास आघाडीसाठी सुद्धा आलो आहे. मित्रपक्षांना सांगायचे आहे आपण मोठे स्वप्न बघत आहोत. महाराष्ट्र सामर्थ्य स्वप्न बघतोय असे असताना अपक्ष मांजर आडवे जाऊ देऊ नका.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment