अल्पवयीन मुलीवर पुण्यात अत्याचार:अत्याचारास मदत करणाऱ्या महिलेवरही हट्टामध्ये गुन्हा दाखल, पुणे पोलिसांकडे केला वर्ग

अल्पवयीन मुलीवर पुण्यात अत्याचार:अत्याचारास मदत करणाऱ्या महिलेवरही हट्टामध्ये गुन्हा दाखल, पुणे पोलिसांकडे केला वर्ग

वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाच्या महिलेवर हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 19 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटना बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलिसांनी सदर गुन्हा बावधन (पुणे) पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एक अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह बावधन (पुणे) येथे राहते. या ठिकाणी तिचे वैभव मुनेश्‍वर (रा. एरंडेश्‍वर, जि. परभणी) या तरुणासोबत ओळख झाली. यावेळी वैभव याने सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतांनाही तिच्यावर अत्याचार केला. मात्र जिवे मारण्याच्या भितीमुळे त्या मुलीने या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. सन 2019 पासून सदर प्रकार सुरु होता. विशेष म्हणजे सदर मुलीला गर्भधारणा होऊ नये यासाठी एका महिलेने तिला गर्भनिरोधक गोळया दिल्या. सदर मुलगी काही दिवसांपुर्वीच गावाकडे आल्यानंतर तिने सदर प्रकार एका नातेवाईकाला सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट हट्टा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यामध्ये वैभव याने त्या मुलीवर अत्याचार केले असून महिलेने गर्भनिरोधक गोळ्या देऊन मुलास सहकार्य केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून हट्टा पोलिसांनी वैभव मुनेश्‍वर सह एका महिलेवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदर घटना बावधन (पुणे) पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांनी सदर गुन्हा व आवश्‍यक कागदपत्रे बावधन पोलिसांकडे वर्ग केली आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment