पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून पार्सल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार:लाेणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघाेली परिसरातील घटना

पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून पार्सल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार:लाेणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघाेली परिसरातील घटना

लाेणीकंद पोलिस ठाण्याचे हद्दीत वाघाेली येथे रहाणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलगी घरात असताना एका डिलिव्हरी बाॅय घरी पार्सल देण्याच्या बहाण्याने आला. त्याने घरात शिरुन मुलीचा शरीरास आक्षेपार्ह स्पर्श करुन त्याने स्वत:चे कपडे काढून मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी जाेरजाेरात रडण्यास लागल्यानंतर आरेपीने तिला धमकावून शांत करत तिला घडलेला प्रकार काेणाला सांगू नकाे असे म्हणत घरातून निघून गेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी डिलिव्हरी बाॅयवर वाघाेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे याबाबत पिडित मुलीच्या 29 वर्षीय आईने आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार या एका साेसायटीत घरकामासाठी गेल्या हाेत्या. त्यावेळी त्यांचे मुलीने राहते घरातून फाेन करुन ती रडू लागली त्यामुळे आई कामावरुन घरी गेली. त्यावेळी मुलीने आईला सांगितले की, एक माणूस पार्सल घेऊन आला व तुमचे पार्सल असल्याचे सांगितले. मुलीने आईला फाेन करुन विचारणा केल्यानंतर तिने आराेपीला 100 रुपये दिले व पार्सल घेतले. त्यानंतर आराेपीने पाणी प्यायचे आहे असे म्हणून घरात आला व त्याने मुलीस जवळ बाेलवून तिच्या गालास हात लावून गाल ओढला तसेच हाताला हात लावाला. त्यानंतर आराेपीने त्याचे कपडे काढून मुलीच्या अंगातील कपडे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मलीने कपडे काढण्यास विराेध केला व ती जाेरात रडायला लागली. ती रडायला लागल्यावर आराेपी साेफ्यावर बसला व तिला मांडीवर बसवून रडू नकाेस म्हणून मांडी हलवू लागला. तिच्या शरीरावर आक्षेपार्ह स्पर्श करुन त्यामुळे मुलगी अजून जाेरात रडण्यास लागली. त्यानंतर आराेपीने तिच्या हातात 100 रुपये देऊन घडलेला प्रकार तुझ्या आईला काही सांगू नकाेस असे म्हणून त्याचे कपडे घालून ताे निघून गेला. यााबाबत आराेपीचा शाेध वाघाेली पोलिस करत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment