वाहतुकीस प्रतिकूल:अजंदा रेल्वे बोगद्याची झाली दयनीय अवस्था; सळया बाहेर आल्यामुळे अपघाताची शक्यता

वाहतुकीस प्रतिकूल:अजंदा रेल्वे बोगद्याची झाली दयनीय अवस्था; सळया बाहेर आल्यामुळे अपघाताची शक्यता

रेल्वे विभागाकडून करण्यात आलेल्या अजंदा-रावेर रेल्वे पुलाच्या नव्या बोगद्याखालून जाण्याऱ्या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे. पुलाखालील रस्ता पुर्णपणे उखडला असून निकृष्ठ कामामुळे बोगद्यातील सळया बाहेर आल्या आहे, तेथे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. परिसरातील ऐनपूर, निंबोल, खिर्डी, अजंदे येथील प्रकाशांसह त्या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी रेल्वेच्या व्हॅगनपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एकमेव व सोईस्कर मार्ग आहे. वाहनधारकांना तालुक्याच्या ठीकाणी जाण्यासाठी याच रेल्वे बोगद्यातून जावे लागते. परंतु, बोगद्याच्या रस्त्याचे निकृष्ठ काम झाल्यामुळे त्यावरील काँक्रिटीकरण पूर्ण उखडले गेले आहे. बोगदा बांधला गेल्यापासून रस्ता काँक्रिटीकरणसाठी वापरलेल्या सळया बाहेर आल्या आहे. सदरच्या रस्त्यावरून प्रवाशी वाहने, शेतकरी शेतमजूर वर्गाची मोठी वर्दळ असते. रेल्वे विभागाचा रस्ता असूनबोगद्याजवळ मोठी काटेरी झुडपे सुध्दा वाढली आहे. दुचाकीस्वारांना तेथून वाहने नेतांना वाहन मधून न्यावे लागते. या बोगद्याजवळील समस्येकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असून निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून तातडीने समस्या सोडवण्याची मागणी वाहनधारक करत आहे. तात्पुरती डागडुजी करुन वेळ मारुन नेतात ^ग्रापंचायतीच्या माध्यमातून रेल्वे विभागाकडे या बोगद्याच्या निकृष्ट कामाविषयी पाठपुरावा केला, त्यानुसार डागडुजी. मात्र ही डागडुजीही निकृष्ठच केली जात असल्याने समस्या कायम राहिली आहे. यावरुन दाखवण्यापुरती उपाययोजना करुन वेळ मारुन नेत असल्याचे स्पष्ट होत आहे. या रस्त्यावरमोठी वर्दळ असल्याने कायमस्वरुपी उपाययोजना अपेक्षित आहे. -निलेश पाटील, माजी ग्रा.पं.सदस्य, अजंदे पाणी साचत असल्याने सळया दिसत नाही पावसामुळे बोगद्यात पाणी साचत असल्याने बाहेर आलेल्या सळया वाहनधारकांच्या निदर्शनास येत नाही. त्याचा नको तेवढा धोका वाढला असून त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यातच नागमोडी रस्ता असल्याने व सळया निघाल्याने मोठ्या अपघाताची शक्यता आहे. आमचा पाठपुरावा राहतो बेदखल ^बोगद्यात वारंवार उद‌्भवणाऱ्या त्रासाला प्रवासी, वाहनधारक कंटाळलेत. अधिकारी व लोकप्रतिनिधींना वारंवार सांगूनही बोगद्यातील निकृष्ट कामाबाबत कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. पाणी साचते हे माहिती असून सुद्धा उपाययोजना होत नसल्यामुळे येथे मोठा अनर्थ नाकारता येणार नाही. -राहुल पाटील, ग्रा.पं.सदस्य, निंबोल

​रेल्वे विभागाकडून करण्यात आलेल्या अजंदा-रावेर रेल्वे पुलाच्या नव्या बोगद्याखालून जाण्याऱ्या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे. पुलाखालील रस्ता पुर्णपणे उखडला असून निकृष्ठ कामामुळे बोगद्यातील सळया बाहेर आल्या आहे, तेथे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. परिसरातील ऐनपूर, निंबोल, खिर्डी, अजंदे येथील प्रकाशांसह त्या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी रेल्वेच्या व्हॅगनपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एकमेव व सोईस्कर मार्ग आहे. वाहनधारकांना तालुक्याच्या ठीकाणी जाण्यासाठी याच रेल्वे बोगद्यातून जावे लागते. परंतु, बोगद्याच्या रस्त्याचे निकृष्ठ काम झाल्यामुळे त्यावरील काँक्रिटीकरण पूर्ण उखडले गेले आहे. बोगदा बांधला गेल्यापासून रस्ता काँक्रिटीकरणसाठी वापरलेल्या सळया बाहेर आल्या आहे. सदरच्या रस्त्यावरून प्रवाशी वाहने, शेतकरी शेतमजूर वर्गाची मोठी वर्दळ असते. रेल्वे विभागाचा रस्ता असूनबोगद्याजवळ मोठी काटेरी झुडपे सुध्दा वाढली आहे. दुचाकीस्वारांना तेथून वाहने नेतांना वाहन मधून न्यावे लागते. या बोगद्याजवळील समस्येकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असून निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून तातडीने समस्या सोडवण्याची मागणी वाहनधारक करत आहे. तात्पुरती डागडुजी करुन वेळ मारुन नेतात ^ग्रापंचायतीच्या माध्यमातून रेल्वे विभागाकडे या बोगद्याच्या निकृष्ट कामाविषयी पाठपुरावा केला, त्यानुसार डागडुजी. मात्र ही डागडुजीही निकृष्ठच केली जात असल्याने समस्या कायम राहिली आहे. यावरुन दाखवण्यापुरती उपाययोजना करुन वेळ मारुन नेत असल्याचे स्पष्ट होत आहे. या रस्त्यावरमोठी वर्दळ असल्याने कायमस्वरुपी उपाययोजना अपेक्षित आहे. -निलेश पाटील, माजी ग्रा.पं.सदस्य, अजंदे पाणी साचत असल्याने सळया दिसत नाही पावसामुळे बोगद्यात पाणी साचत असल्याने बाहेर आलेल्या सळया वाहनधारकांच्या निदर्शनास येत नाही. त्याचा नको तेवढा धोका वाढला असून त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यातच नागमोडी रस्ता असल्याने व सळया निघाल्याने मोठ्या अपघाताची शक्यता आहे. आमचा पाठपुरावा राहतो बेदखल ^बोगद्यात वारंवार उद‌्भवणाऱ्या त्रासाला प्रवासी, वाहनधारक कंटाळलेत. अधिकारी व लोकप्रतिनिधींना वारंवार सांगूनही बोगद्यातील निकृष्ट कामाबाबत कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. पाणी साचते हे माहिती असून सुद्धा उपाययोजना होत नसल्यामुळे येथे मोठा अनर्थ नाकारता येणार नाही. -राहुल पाटील, ग्रा.पं.सदस्य, निंबोल  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment