सरकारी जमिनीवर चारा निर्मितीचा प्रयोग करजगावात:उगवलेला चारा शेतकऱ्यांना केला मोफत वितरित; जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम‎

सरकारी जमिनीवर चारा निर्मितीचा प्रयोग करजगावात:उगवलेला चारा शेतकऱ्यांना केला मोफत वितरित; जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम‎

सरकारी जमिनीवर चारा उगवून तो शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्याचा उपक्रम वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनने सुरू केला आहे. मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे यांच्या पुढाकाराने हा प्रयोग चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत परतवाडानजीकच्या करजगाव येथे सुरू केला असून, तेथे उगवलेला चारा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. शेतकरी आत्महत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य शासनाने पूर्व विदर्भातील नागपूर आणि पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांसह राज्यातील एकूण १४ जिल्हे अति चिंताग्रस्त म्हणून घोषित केले आहे. पुढे त्याच जिल्ह्यांसाठी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. त्या १४ जिल्ह्यांपैकी हिरवा चारा उगवून तो शेतकऱ्यांना वितरित करण्याचा प्रयोग प्रत्यक्षात सुरू होणारा हा पहिलाच जिल्हा आहे. शेतकऱ्यांना शेतीमधून हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. सततची नापिकी आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळेही त्यांना बरेचदा हताश-निराश व्हावे लागते. त्यामुळे काही शेतकरी थेट आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. परिणामी शासनाने पश्चिम विदर्भातील पाच, पूर्व विदर्भातील वर्धा आणि मराठवाड्यातील इतर काही जिल्हे मिळून १४ जिल्ह्यांसाठी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली आहे. या मिशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. सरकारी जमिनीवर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करून तो चारा शेतकऱ्यांना मोफत पुरविणे, ही त्यापैकीच एक योजना आहे. या वेळी हेलोंडे यांच्याशिवाय करजगावच्या सरपंच इंदिराबाई वानखडे, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक उपायुक्त संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, बीडीओ नारायण अमझरे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश ठोंबरे, मिशनचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद कापडे आदी मान्यवरांसह गोपालक व शेतकरी उपस्थित होते. योगदानाबद्दल यांचा सत्कार या वेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद राऊत, रोजगार सेवक प्रवीण वैश्य, सहायक तांत्रिक अधिकारी ढवळे, तांत्रिक सहायक मंगेश वानखडे, हिरव्या चाऱ्याची राखण करणारे गजानन शिरभाते यांचा त्यांच्या योगदानाबद्दल मिशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment